ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

भिलवडी जिल्हा परिषद गटातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रतिक पाटील विजयी ; काँग्रेसच्या सलामत, हजारे विजयी

 

दर्पण न्यूज भिलवडी/ पलूस:-  भिलवडी जिल्हा परिषद गटातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रतीक पाटील , भिलवडी पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार  हजराबी सलामत,  वसगडे पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार शोभा हजारे विजयी झाल्या आहेत.

भिलवडी जिल्हा परिषद गटातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रतिक पाटील यांना 12328 मते मिळाली आहेत.  भारतीय जनता पक्षाचे उमेदवार महेश पाटील यांना 9207 मते मिळाली आहेत. भिलवडी पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार हजराबी सलामत यांना 5568 मते मिळाली आहेत. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सुनिता गायकवाड यांना 5377 मते मिळाली आहेत.

वसगडे पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार शोभा हजारे यांना 5580 मते मिळाली आहेत. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार मंजुषा पाटील यांना 4854  मते मिळाली आहेत.

या निवडणुकीत भिलवडी जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाचे प्रतीक पाटील, भिलवडी पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार हजराबी सलामत आणि वसगडे पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार शोभा हजारे या विजयी झाल्या आहेत.

भिलवडी जिल्हा परिषद गटातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि दोन्ही पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी होताच पलूस, भिलवडी, वसगडे आणि इतर गावांमध्ये काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जल्लोष केला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!