महाराष्ट्रमाहिती व तंत्रज्ञानराजकीय
सी. पी. आर रुग्णालयात शनिवार 20 डिसेंबर पासून वाहतूक मार्गात बदल

दर्पण न्यूज कोल्हापूर, अनिल पाटील
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर रुग्णालयामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रुग्णालयातील विविध इमारतीचे दुरुस्ती व नुतनीकरणाचे काम सुरु आहे. रुग्णालयाच्या आवारात वाहतूक व्यवस्थेमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे रुग्णालयाच्या आवारात वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये या करिता शनिवार, दिनांक २० डिसेंबर पासून गोदावरी इमारतीजवळील प्रवेशद्वारातून (गोदावरी गेट-आत) दुचाकी व चारचाकी वाहनांना आतमध्ये येण्याकरिता व शाहू स्मारकाकडील असलेल्या कुंभी इमारतीच्या (कुंभी गेट-बाहेर) प्रवेशद्वारातून वाहनांना बाहेर जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी दिली आहे.



