सांगली जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज ; जिल्हाधिकारी अशोक काकडे
248 झोनल अधिकारी, 8,979 कर्मचारी नियुक्त - 2039 मतदान केंद्रे, 18,18,742 मतदार संख्या - 7 फेब्रुवारीला मतदान, 9 फेब्रुवारीला मतमोजणी

दर्पण न्यूज मिरज/ सांगली : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी येत्या 7 फेब्रुवारीला मतदान होणार असून, 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, एकूण 2 हजार 39 मतदान केंद्रांवर मतदान पार पडणार आहे. त्यासाठी 248 झोनल अधिकारी आणि 8 हजार 979 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर 18 लाख 18 हजार 742 मतदार असून, मतदारांनी मतदान केंद्रावर जावून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.
जिल्ह्यात एकूण 2039 मतदान केंद्रे
तालुकानिहाय मतदान केंद्रांची संख्या पुढीलप्रमाणे – आटपाडी तालुका – 152, जत तालुका – 292, खानापूर तालुका – 130, कडेगाव तालुका – 148, तासगाव तालुका – 201, कवठेमहांकाळ तालुका -130, पलूस तालुका – 129, वाळवा तालुका – 360, शिराळा तालुका – 171, मिरज तालुका – 326
248 झोनल अधिकारी, 8979 कर्मचारी नियुक्त
मतदानासाठी नेमणूक केलेल्या तालुकानिहाय झोनल अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे – आटपाडी तालुक्यात 16 झोनल अधिकारी, 668 कर्मचारी, जत 40 अधिकारी, 1285 कर्मचारी, खानापूर 15 अधिकारी, 572 कर्मचारी, कडेगाव 16 अधिकारी 652 कर्मचारी, तासगाव 26 अधिकारी, 884 कर्मचारी, कवठेमहांकाळ 16 अधिकारी, 572 कर्मचारी, पलूस 14 अधिकारी 568 कर्मचारी, वाळवा 46 अधिकारी, 1584 कर्मचारी, शिराळा 19 अधिकारी 760 कर्मचारी, मिरज 40 अधिकारी 1434 कर्मचारी अशा एकूण 248 झोनल अधिकारी व 8 हजार 979 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
जिल्ह्यात 18,18,742 मतदार संख्या
जिल्ह्यात स्त्री मतदार – 894781, पुरूष मतदार – 923919, इतर मतदार – 42, एकूण मतदार – 1818742 असून, तालुकानिहाय मतदार संख्या पुढीलप्रमाणे – आटपाडी तालुका – स्त्री मतदार – 59372, पुरूष मतदार – 61738, इतर मतदार – 4, एकूण मतदार – 121114, जत तालुका – स्त्री मतदार – 127300, पुरूष मतदार – 140188, इतर मतदार – 1, एकूण मतदार – 267489, खानापूर तालुका – स्त्री मतदार – 57002, पुरूष मतदार – 57449, इतर मतदार – 3, एकूण मतदार – 114454, कडेगाव तालुका – स्त्री मतदार – 68443, पुरूष मतदार – 67141, इतर मतदार – 3, एकूण मतदार – 135587, तासगाव तालुका – स्त्री मतदार – 92988, पुरूष मतदार – 96621, इतर मतदार – 5, एकूण मतदार – 189614, कवठेमहांकाळ तालुका – स्त्री मतदार – 61748, पुरूष मतदार – 63423, इतर मतदार – 0, एकूण मतदार – 125171, पलूस तालुका – स्त्री मतदार – 62148, पुरूष मतदार – 62493, इतर मतदार – 2, एकूण मतदार – 124643, वाळवा तालुका – स्त्री मतदार – 147048, पुरूष मतदार – 151786, इतर मतदार – 3, एकूण मतदार – 298837, शिराळा तालुका – स्त्री मतदार – 68483, पुरूष मतदार – 70654, इतर मतदार – 2, एकूण मतदार – 139139, मिरज तालुका – स्त्री मतदार – 150249, पुरूष मतदार – 152426, इतर मतदार – 19, एकूण मतदार – 302694.
तालुकानिहाय मतमोजणीचे ठिकाण पुढीलप्रमाणे –
आटपाडी – पहिला मजला हॉल नवीन प्रशासकीय इमारत, तहसिलदार कार्यालय, आटपाडी. जत – जुने शासकीय धान्य गोदाम क्र. 2, नवीन प्रशासकीय इमारत, जत तहसिल कार्यालयाच्या समोर, जत. खानापूर – इनडोअर स्पोर्ट्स फॅसिलिटी सेंटर (Indoor Sports facility centre), बळवंत कॉलेज विटा. कडेगाव – औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), कडेगाव, कराड कडेगाव रोड, कडेगाव. तासगाव – शासकीय बहुउद्देशीय कक्ष, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तासगाव, दत्तमाळ. कवठेमहांकाळ – पुरवठा शाखा समोरील मोकळी जागा, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कवठेमहांकाळ. पलूस – मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, दिवाणी न्यायालयाजवळ, पलूस. वाळवा – शासकीय धान्य गोदाम, बहे रोड, ईश्वरपूर. शिराळा – श्री गोरक्षनाथ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिराळा. मिरज – शासकीय नवीन धान्य गोदाम, मिरज, वैरण बाजार, मिरज.



