सांगली येथील जी. ए. हायस्कूल सांगलीच्या रोशनी बनसोडे हिला राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक .

दर्पण न्यूज मिरज सांगली -; यंगमेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटी सांगलीच्या जी. ए. हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ची विद्यार्थिनी कु. रोशनी राजेश बनसोडे इयत्ता नववी हिने नांदेड येथे झालेल्या राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघामध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले आहे. महाराष्ट्राच्या संघात सांगलीतून सहभागी होणारी ती एकमेव खेळाडू आहे. गेली दोन वर्षे शाळेचे क्रीडाशिक्षक एस. ए. वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ती नेटबॉल या खेळाचा सराव करीत आहे. सुवर्णपदक विजेत्या महाराष्ट्र संघात सहभागी झालेल्या रोशनीने जी .ए. हायस्कूलचे नाव उज्वल केले आहे .या तिच्या यशाबद्दल संस्थेतर्फे व शाळेतर्फे तिचे अभिनंदन करण्यात आले. अशा या राष्ट्रीय खेळाडूचे परिसरातून कौतुक होत आहे.
रोशनीला संस्थेच्या अध्यक्षा मा.डॉ. मेघनाताई कोरे, सर्व संचालक, यांचे प्रोत्साहन, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, पर्यवेक्षक व क्रीडाशिक्षक एस. ए. वाडकर यांचे मार्गदर्शन लाभले.



