महाराष्ट्रराजकीय

भिलवडी जि प गटातील काँग्रेसचे उमेदवार, प स गणातील उमेदवारांना विजयी करा : आमदार डॉ विश्वजीत कदम

माळवाडीत कोपरा सभेस उत्स्फूर्त प्रतिसाद ; काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा मोठा सहभाग

दर्पण न्यूज पलूस/ माळवाडी/भिलवडी :
२०१७ सालानंतर तब्बल नऊ वर्षानंतर या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक होत आहे. सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानेच या निवडणूका झाल्या. काँग्रेसमध्ये लोकशाही आहे. त्यामुळे संविधानाचा अधिकार अंमलात आणा असे मत पलूस-कडेगावचे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी व्यक्त केले. माळवाडी ता.पलूस येथे
भिलवडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रतीक संग्राम पाटील व माळवाडी पंचायत समिती गणाचे उमेदवार हजराबी बालेचांद सलामत यांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते.
डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, भिलवडी आणि बारा वाड्यांचे ज्यांनी नेतृत्व केले. ज्यांना मानसन्मान होता असे
स्व.बाळासाहेब काका पाटील यांचे नातू व लोकनेते स्व. संग्राम पाटील यांचे प्रतीक पाटील हे सुपुत्र आहेत. तरूण व्यक्तीमत्व आहे. नक्कीच ते सामाजिक व राजकीय कार्याचा वसा चालवतील. हजराबी सलामत यांनाही निवडून आल्यानंतर सभापतीपद मिळू शकेल. दोन्ही उमेदवार जनतेसाठी तळमळीने काम करतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
ते म्हणाले,
स्व. पतंगराव कदम यांचे या मतदारसंघात काम आहे. त्यांच्या पश्चात माझ्यासह आपण सर्वांनी त्यांचा वसा पुढे नेटाने नेत आहात. कृष्णाकाठी अनेक संकटे आली. २०१९ चा प्रलयंकारी महापूर त्यानंतर कोरोना यांत मदत केली. तेव्हा विरोधक दिसले नसल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीत मोठ्या मताधिक्याने या दोन उमेदवारांना निवडून द्या.
२०२९ ला भाजप मित्र पक्षांना लाथ घालून हाकलून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
१२-१३ कोटींची विकासकामे या परिसरात झालेली आहेत.
माळवाडीत उच्चांकी मतदान हवे आहे. निकाल लागताच
माझ्या विधानसभेचा गुलाल लागल्याचे समाधान आहे. सर्व जातीधर्मात निवडून दिलेले उमेदवार चांगले काम करतील. तरूण वयात जिद्द असते,
विश्वास असतो त्यामुळे
या दोन उमेदवारांना आशीर्वाद देण्याचे आवाहन डॉ.कदम यांनी केले.

ज्येष्ठ नेते सहदेव कदम, जिल्हा नाभिक समाजाचे उपाध्यक्ष आर.के. रोकडे, सरपंच अश्विनी साळुंखे, माजी सभापती विजय कांबळे, बी.डी. पाटील, जि.प. उमेदवार प्रतीक पाटील, पं.स.उमेदवार हजराबी सलामत यांची भाषणे झाली.
स्वागत संताजी जाधव, प्रास्ताविक गजानन भोळे यांनी केले. यावेळी कुमार पाटील, महादेव महिंद, स्वप्निल तावदर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, नेते, कार्यकर्ते व ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माळवाडी, भिलवडीत आता प्रचाराने वेग घेतला आहे.
भरघोस मतं देवून काँग्रेस पक्षाला विजयी करा.
त्याशिवाय पर्याय नाही असं नेतेमंडळींनी बोलताना सांगितले.
महिलांनी औक्षण करून आ.डॉ.विश्वजीत कदम यांचे स्वागत केले. तरूणांनी घोषणा दिल्या. एकंदरीतच ग्रामस्थांचा उत्साह अधिक दिसून आला. भिलवडी जिल्हा परिषद गटात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचा चंग बांधण्यात आला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!