महाराष्ट्रसामाजिक
कसबा तारळे येथील श्रीमती लक्ष्मीबाई धोंडी पाटील यांचे निधन

दर्पण न्यूज कोल्हापूर, प्रतिनिधी :-
राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे येथील श्रीमती लक्ष्मीबाई धोंडी पाटील यांचे वयाच्या 96 वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. दूध साखर महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ एन डी पाटील, पेठ वडगाव च्या यादव कॉलेजच्या क्रीडा शिक्षिका प्राध्यापिका अलका पाटील आणि कसबा तारळे येथील शेतकरी विकास संस्थेचे माजी चेअरमन संजय पाटील(पापा ) यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन रविवार तारीख 21 रोजी सकाळी नऊ वाजता आहे.



