शिराळा नगरपंचायत प्रभाग क्र. 4 मतदानासाठी संबंधित शाळांना सुट्टी जाहीर

दर्पण न्यूज मिरज / सांगली : सांगली जिल्ह्यातील शिराळा नगरपंचायत प्रभाग क्र. 4 मधील आदर्श बालक मंदिर, शिराळा मधील मतदान केंद्र असलेल्या वर्ग खोलीस शुक्रवार दि. 19 डिसेंबर 2025 रोजी तसेच शिराळा नगरपंचायत प्रभाग क्र. 4 मधील मतदान केंद्र आदर्श बालक मंदिर, शिराळा, कन्या शाळा, शिराळा व न्यू इंग्लिश स्कूल, शिराळा या शाळांना शनिवार, दि. 20 डिसेंबर 2025 रोजी सुट्टी जाहीर केल्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केले आहेत.
सांगली जिल्ह्यातील शिराळा नगरपंचायतीच्या प्रभाग क्र. 4 च्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. दि. 20 डिसेंबर 2025 रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून मतदान अधिकारी मतदान साहित्य घेवून दि. 19 डिसेंबर 2025 रोजी मतदान केंद्रावर पोहोचणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या दि. 11 नोव्हेंबर 2008 च्या आदेशानुसार ज्या दिवशी मतदान अधिकारी कर्मचारी सर्व मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्राचा ताबा घेतात, त्या दिवशी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीतील शाळांना सुट्टी असणे आवश्यक आहेत. तसेच मतदानाच्या दिवशीसुध्दा शाळांना सुट्टी राहील, याची खात्री करण्यात यावी, असे नमूद आहे. शिराळा नगरपंचायतीच्या प्रभाग क्र. 4 सदस्य पदाची मतदान प्रक्रिया शनिवार दि. 20 डिसेंबर 2025 रोजी पार पडणार असून प्रभाग क. 4 चे मतदान केंद्र हे आदर्श बालक मंदिर शिराळा येथे असून कन्या शाळा, शिराळा व न्यू इंग्लिश स्कूल, शिराळा या शाळा एकाच परिसरात असल्याने या तिन्ही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.



