साने गुरुजी संस्कार केंद्र

🌼साने गुरुजी संस्कार केंद्र भिलवडी 🌼
यांचे वतीने श्रींची मूर्ती घरीच विसर्जन करा सुंदर पुस्तक भेट मिळवा या उपक्रमात सहभागी झालेल्या गणेश भक्तांचा स्नेह मेळावा सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात पार पडला या उपक्रमात भिलवडी आणि परिसरातील 90 होऊन अधिक गणेश भक्त सहभागी झालेले होते प्रत्यक्ष मेळाव्यात सुमारे 50 लोकांनी सहभाग घेतला प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक केंद्रप्रमुख सुभाष कवडे यांनी करून या उपक्रमाचा हेतू पर्यावरण रक्षण करून विद्यार्थ्यांवर पर्यावरण रक्षणाचे संस्कार रुजवणे हा असल्याचे सांगितले यावेळी उपस्थित सर्व उपक्रमातील सहभागी गणेश भक्तांना सुंदर संस्कारक्षम पुस्तक उपस्थित विद्यार्थ्यांच्या हस्ते भेट देण्यात आले हे पुस्तक पालवी शेटे अनन्या घोडके वेदश्री निकम अमेय नलवडे या संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी पर्यावरण पूरक सन काळाची गरज या विषयावर चर्चासत्र संपन्न झाली या चर्चा सत्रात सुबोध वाळवेकर संजय पाटील सर संभाजी महिंद सौ. शैलजा पाटील मॅडम उत्तम भोई मेजर पुरुषोत्तम जोशी महावीर शेडबाळे सर यांनी चर्चा सत्रात सहभाग घेतला पर्यावरण रक्षण काळाची गरज असून यासाठी सर्वांनी सक्रिय होण्याची गरज आहे अशा भावना चर्चासत्रात सर्वांनीच व्यक्त केल्या दिवाळीमध्ये फटाके नको पुस्तके वाचू हा ही उपक्रम राबविण्याचे ठरले.कार्यक्रमाचे संयोजन केंद्रप्रमुख सुभाष कवडे यांचे मार्गदर्शनाखाली सौ विद्या निकम सौ.मयुरी नलवडे गजानन माने प्रथमेश वावरे यांनी केले उपक्रमाचे हे पाचवे वर्ष होते. भिलवडीत निर्माल्य संकलन उपक्रम आता 100% यशस्वी झाला आहे. याच धरतीवर गणेश मूर्ती घरीच विसर्जन करा हा उपक्रम दरवर्षी राबविण्याचे या स्नेह मेळाव्यात सर्वांनी एकमताने ठरविले कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजींच्या खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या प्रार्थनेने झाली. शेवटी गजानन माने यांनी सर्वांचे आभार मानले.


