सांगली बस आगार येथील आरोग्य शिबिराचा 75 चालक- वाहकांनी घेतला लाभ
जायन्ट्स परिवार हरिपूर, सांगली बस आगार आणि उषःकाल हॉस्पिटल सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

दर्पण न्यूज सांगली मिरज :-
सांगली बस आगार येथे घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचा 75 चालक आणि वाहक यांनी लाभ घेतला. हे आरोग्य शिबीर जायन्ट्स परिवार हरिपूर, सांगली बस आगार आणि उषःकाल हॉस्पिटल सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने घेऊन जायन्ट्स सप्ताहाची सुरवात करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी सांगली आगारचे महेश पाटील मोलाचे मार्गदर्शन केले.
या आरोग्य शिबीरास Ad. विलासराव पवार, प्रशांत माळी, रवींद्र ताटे, महेश पाटील, वैशाली कुलकर्णी,. सुनिता शेरीकर या प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती.
या शिबिराचा चालक व वाहक 75 चालक आणि वाहकांनी लाभ घेतला. या आरोग्य शिबिरा बरोबर मंगळवार दि. 23 सप्टेंबर रोजी सांगली बस आगार येथे रक्तदान शिबीर आणि महिला आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे. डॉ. आशा गाजी यांच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात येणार आहे.श्री. मीत & त्यांचा स्टाफ
आरोग्य शिबीर वैशाली माने, किशोरी काटे, वैशाली सुतार, हरामीतकौर पाटील, परिमिता लोखंडे, स्वप्नाली गायकवाड, सुजाता पाटील, स्मिता चौगुले, स्नेहा गायकवाड यांचे सहकार्य लाभले. राजेंद्र घुगरे , महेश पाटील यांनी नियोजन केले होते.
आरोग्य शिबीर कार्यक्रमाचे नियोजन सुनिता शेरीकर यांनी केले.