कसबा वाळवे येथील मंडल अधिकारी कुलदीप शिवराम जनवाडे याला 27 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केले जेरबंद


दर्पण न्यूज कोल्हापूर, अनिल पाटील
सातबारा पत्रकी नाव नोंद करण्यासाठी 27हजार रुपयाची लाच स्वीकारताना राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील मंडलाधिकारी
कुलदीप शिवराम जनवाडे वय -47 वर्ष. (मंडलधिकारी) कसबा वाळवे ,तालुका- राधानगरी, जिल्हा- कोल्हापूर.
राहणार री.स नं 1042 ब/5/ब प्लॉट नंबर- 23 ,A वॉर्ड, फुलेवाडी रिंग रोड, अरुण सरनाईक नगर, क्रांतीसिंह नाना पाटील नगर चौक ,शाहू हायस्कूल मागे ,कोल्हापूर. याला आज लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
19/12/2025 रोजी तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे लेखी तक्रार दिली की त्यांचे शेतजमीन गट क्रमांक 479 मद्ये तक्रारदार यांचे 7/12 पत्रकी नाव लावणेसाठी तक्रारदार यांचेकडे मंडळ अधिकारी कुलदीप शिवराम जनवाडे कसबा वाळवे यांनी 10000/-₹ च्या लाचेची मागणी केली आहे म्हणुन तक्रार दाखल केली होती.
तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार 19/12/2025 ,20/12/2025 पडताळणी केली असता, आरोपी मंडल अधिकारी कुलदीप शिवराम जनवाडे यांनी तक्रारदार यांची अर्जुनवाडा येथे असलेली , शेतजमीन गट क्रमांक- 479 मध्ये सातबारा पत्रकी, नाव नोंद करण्याकरिता तक्रारदार हे कसबा वाळवे मंडळ कार्यालय, तालुका राधानगरी जिल्हा- कोल्हापूर येथे गेले असता, त्यांच्याकडे नंदकुमार यांच्या नाव लावण्याचा प्रकरणासाठी 7,000 रुपयाची,व व तक्रारदार हे पाठपुरावा करत असलेले, त्यांच्या गावातील इतर 04 प्रकरणासाठी 20,000 रू.लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
दिनांक 23/12/2025 रोजी कुलदीप जनवाडे यांनी, तक्रारदार नंदकुमार पाटील यांच्याकडे पडताळणीमध्ये मागणी केलेले 10,000 पैकी 7,000 व उर्वरित चार प्रकरणांसाठी 20,000 अशी एकूण रुपये 27,000 रुपये लाच रक्कम स्वीकारताना, रंगेहात पकडण्यात आले आहे.
त्यानंतर आरोपीचे अंग झडती /वाहन /कार्यालयाची झडती, कार्यालय झडती पंचासमक्ष करण्यात आली. आरोपी कुलदीप जनवाडे यांचा मोबाइल, तापासकामी जप्त करण्यात आला आहे.
आरोपीच्या घरझडतीसाठी पथक तात्काळ रवाना करण्यात आले आहे.घरझडतीची प्रक्रिया सुरु आहे.
आरोपी लोकसेवक कुलदीप जनवाडे, यांच्याविरुद्ध राधानगरी पोलीस ठाणे जि. कोल्हापूर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलमान्वये, गुन्हा नोंद करण्यात आला आहे
ही कारवाई पोलिस उप अधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक उज्वला भडकमकर ,
प्रकाश भंडारे,,, विकास माने, पोलीस नाईक सचिन पाटील, पोलीस कॉन्स्टेबल उदय पाटील यांनी केली.



