विवान,रियार्थ,अभय,शौर्य व हित आघाडीवर : 11 वर्षाखालील मुलामुलींच्या जिल्हा निवङ बूद्धीबळ स्पर्धा

कोल्हापूरःअनिल पाटील
कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने चेस असोसिएशन कोल्हापूरने छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे आयोजित केलेल्या अकरा वर्षाखालील मुला मुलींच्या कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा आज सुरू झाल्या.
महालक्ष्मी बँकेचे अध्यक्ष अँङ राजेंद्र किंकर यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले .यावेळी आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले,मनीष मारुलकर,धीरज वैद्य,सागर मुळे,आरती मोदी व्यासपीठावर उपस्थित होते.पत्रकार राजेंद्र मकोटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.या स्पर्धेत मुलांचे गटात कोल्हापूर जिल्ह्यातील चाळीस बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत त्यांच्यामध्ये स्विस लीग पद्धतीने एकूण सहा फेऱ्या होणार आहेत. तर मुलींच्या गटात आठ मुली सहभागी झाले असल्यामुळे त्यांच्यामध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने सात फेऱ्या होणार आहेत.मुलांच्या गटात आज झालेल्या तिसऱ्या फेरीनंतर अग्रमानांकित इचलकरंजीचा विवान सोनी,द्वितीय मानांकित इचलकरंजीचा रियार्थ पोद्दार,तृतीय मानांकित जांभळीचा अभय भोसले,चौथा मानांकित इचलकरंजीचा शौर्य बगडीया व सहावा मानांकित जयसिंगपूरचा हित बलदवा हे पाच जण तीन गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.पाचवा मानांकित कोल्हापूरचा आरव पाटील,आठवा मानांकित कोल्हापूरचा अर्णव पाटील,आदित्य घाटे,आदित्य ठाकूर,वेदांत बांगड,सर्वेश पोतदार,श्रवण ठोंबरे, अरुश ठोंबरे,आराध्य पवार, आराध्य ठाकुर देसाई, वरद दिवाण,सिद्धांत चौगुले अवनीश जीतकर व वेदांत झेंडे हे चौघेजण दोन गुणासह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.मुलींच्या गटात तिसऱ्या फेरीनंतर नांदणीची सिद्धी बुबणे तीन गुणासह आघाडीवर आहे तर सिद्धी कर्वे जयसिंगपूर,सांची चौधरी इचलकरंजी,राजेश्वरी मुळे कोल्हापूर ,या चौघी दोन गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.