सांगलीत 2 ते 6 मार्च या कालावधीत महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
(सुधारीत
सांगली : राज्यातील विविध संस्कृतीचे आदान – प्रदान , स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवय्यांची माहिती त्याचबरोबर लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय (मुंबई ) तसेच सांगली जिल्हा प्रशासन यांच्या वतीने दि. 2 ते 6 मार्च या कालावधीत महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली. सांस्कृतिक महोत्सवाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे – दि. 2 मार्च रोजी कल्पद्रुम मैदान नेमिनाथ नगर येथे सायंकाळी ६.३० वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून या दिवशी सायं – ७ वाजता गर्जा महाराष्ट्र (अभिनेत्री निवेदक – पूर्वी भावे, सेलेब्रिटी गायक (अभंग) – ज्ञानेश्वर भरतनाट्यम नृत्य – धनश्री आपटे आणि शिष्यागणा, मर्दानी खेळ, मल्लखांब प्रात्याक्षिक, गजी नृत्य, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.
दि. ३ मार्च, रोजी सकाळी – ९ ते १२ वा. पिवळा सांगली हॅपी स्ट्रीट पहिल्या सत्रात सायं – ५.३० ते ७ संगीत नाट्यरंग (सांगलीच्या संगीत नाटकाचा सुवर्णकाळ) दुसऱ्या सत्रात – ७ ते ९. ३० सुप्रसिद्ध पार्श्वगायिका – वैशाली सामंत यांचा लाईव्ह कार्यक्रम.
दि ४ मार्च रोजी सायं – ५.३० ते ७ -लोककला /शाहीर (सांगली परिसरातील लोक कलाकारांचे सादरीकरण , त्यानंतर ७ ते ९. ३० यावेळेत आपली संस्कृती (परंपरा जाणणाऱ्या लोककलांचा अविष्कार).
दि. ५ मार्च रोजी ,सायं – ५.३० ते ७ -नृत्य संध्या (भरतनाट्यम, कथथक, मंगळागौर खेळ, सादरीकरण तर ७ ते ९.३० या वेळेत गुढी महाराष्ट्राची (महाराष्ट्रातील सण परंपरेची गौरवशाली संस्कृती.
अंतिम दिवशी म्हणजे दि. 6 मार्च रोजी सायं – ५.३० ते ७ वाद्य रजनी (विविध लोकवाद्यांचे सादरीकरण / जुगलबंदी) तर सायं – ७ ते ९. ३० श्रीमंतयोगी (छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनावरील कला अविष्कार सादर करण्यात येणार आहे. तसेच दररोज सकाळी १० ते सांय ६ या वेळेतशस्त्र प्रदर्शन दुर्मिळनाने तंतुवाद्य हळद बेदाणा हस्तकला आदींचे प्रदर्शन तर बचत गट त्याचबरोबर खाद्यपदार्थांचे सुमारे पन्नास हुन अधिक स्टॉल लावण्यात येणार आहेत.
पाच दिवस चालणाऱ्या या सांस्कृतिक महोत्सवात सर्व वयोगटाच्या नागरिकांनी, बच्चे कंपनी, वृद्ध, अपंग, स्त्री -पुरुष या सर्वांना मोफत प्रवेश राहणार असून या सांस्कृतिक महोत्सवाचा जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. या आढावा बैठकीसाठी मनपा उपायुक्त – स्मृती पाटील, प्रमोद तारळकर, विनीता करवीर, आर जी टोने, ए बी कोले,अश्विनी पाटील, आकाश बावडेकर, अप्पासो म्हलारी यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.