करवीरचे माजी आमदार स्व पी. एन. पाटील यांचा प्रथम पुण्यस्मरण ; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे अभिवादन

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे);;:-करवीरचे माजी आमदार स्वर्गीय पी. एन. पाटीलसाहेब यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी सडोली खालसा (ता. करवीर) येथे जाऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.*
*स्व. पी. एन. पाटीलसाहेब हे करवीर तालुक्याच्या विकासात मोलाची भूमिका बजावणारे, लोकहितासाठी झटणारे, अत्यंत कर्तव्यनिष्ठ आणि लोकांच्या मनात घर करणारे नेते होते. त्यांच्या आठवणी आजही स्थानिक जनतेच्या मनात जिवंत आहेत.*
*मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी त्यांच्या कार्याचा स्मरण करताना त्यांच्या लोकसेवेच्या व समाजहिताच्या कार्याचा गौरव केला आणि पुढेही त्यांच्या विचारांना अनुसरून विकासाची वाटचाल सुरू राहील, अशी भावना व्यक्त केली.*
*यावेळी माजी आमदार के पी पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पी एन पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील (आबाजी), गोकुळचे संचालक युवराज पाटील (बापू), केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, गोकुळचे संचालक किसनराव चौगुले, बाळासाहेब खाडे, राहुल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.