विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँकेचा अमृतमहोत्सव उत्साहात ;उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची उपस्थिती

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी मारूती डी कांबळे ;- मुरगूड ता. कागल येथील विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँकेच्या 75 व्या अमृतमहोत्सवी कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सभासदांना भेटवस्तू वितरण राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.*
*कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ होते.*
*यावेळी बँकेच्या प्रदीर्घ आणि यशस्वी वाटचालीचा गौरव करण्यात आला आणि सहकार क्षेत्रातील योगदानासाठी संस्थेचे अभिनंदन करण्यात आले.*
*उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकारी चळवळीचे महत्त्व अधोरेखित करत बँकेच्या भविष्यातील योजना व डिजिटल युगातली तयारी यावर प्रकाश टाकला.*
*मंत्री श्री. हसनसाहेब मुश्रीफ यांनीही बँकेच्या सामाजिक व आर्थिक योगदानाचे कौतुक करत, सहकार संस्थांनी पारदर्शकता राखून सदस्यांचा विश्वास जपावा, असे मत व्यक्त केले.*
*या अमृतमहोत्सवी कार्यक्रमास माजी आमदार संजयबाबा घाटगे, गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, चेअरमन प्रविणसिंह पाटील, चेअरमन बाबासाहेब शिंदे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, जिल्हाध्यक्षा शितलताई फराकटे, सुहासिनी पाटील, बिद्री कारखान्याचे व्हाईस चेअरमन मनोजभाऊ फराकटे, शहराध्यक्ष अदिल फरास, तालुकाध्यक्ष विकास पाटील, बिद्री कारखान्याचे माजी संचालक प्रविणसिंह पाटील, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, अविनाश जोशी, व्हा. चेअरमन वसंतराव शिंदे, नंदकुमार ढेंगे, दिग्विजयसिंह पाटील, एकनाथ मांगोरे, शिवाजीराव पाटील, ॲड सुधीर सावर्डेकर, विश्वास चौगले, अमित गाताडे, रघुनाथ कुंभार, स्थानिक लोकप्रतिनिधी, संचालक मंडळ, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.