प्रधानमंत्री आवास योजनेच्या सर्वेक्षणासाठी 31 मे पर्यंत मुदतवाढ

दर्पण न्यूज सांगली : प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा 2 अंतर्गत पात्र कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यासाठी 31 मे 2025 पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे. यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
केंद्र सरकारच्या निर्णयानुसार, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा 2 सन 2024-2025 ते 2028-2029 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सन 2018 मध्ये झालेल्या आवास प्लस सर्वेक्षणामध्ये तयार करण्यात आलेल्या प्रतिक्षा यादीमध्ये समाविष्ट न झालेले व सिस्टीमव्दारे अपात्र झालेले परंतु सद्यस्थितीत पात्र असलेल्या कुटुंबांचे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा 2 अंतर्गत सुधारीत वगळनी निकषांनुसार सर्वेक्षण करण्याच्या सूचना ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार यांनी दिल्या आहेत.
सुधारीत अपात्रता निकष पुढीलप्रमाणे आहेत – तीन / चारचाकी वाहन असणारी कुटुंबे, तीन / चार चाकी कृषी उपकरण असणारी कुटुंबे, रूपये 50 हजार किसान क्रेडिट कार्ड किंवा त्याहून अधिक क्रेडिट मर्यादा असलेली कुटुंबे, कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी असलेली कुटुंबे, शासनाकडे नोंदणीकृत बिगर कृषी उद्योग असलेली कुटुंबे, कुटूंबातील कोणताही सदस्य दरमहा 15 हजार रूपये पेक्षा जास्त कमवत असलेली कुटुंबे, आयकर भरणारी कुटुंबे, व्यावसायिक कर भरणारी कुटुंबे, 2.5 एकर किंवा त्याहून अधिक बागायती जमीन असणारी कुटुंबे व 5 एकर पेक्षा जास्त परंतु जिरायती जमीन असणारी कुटुंबे.
या आधारावर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधून ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांमार्फत सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले. तालुकानिहाय सर्वेक्षणाची आकडेवारी पुढीलप्रमाणे.
|
|
|
एकूण सर्वेक्षण |
आटपाडी | 315 | 2826 | 3141 |
जत | 194 | 14356 | 14550 |
कडेगाव | 10 | 3266 | 3276 |
कवठेमहांकाळ | 189 | 4257 | 4446 |
खानापूर | 5 | 3174 | 3179 |
मिरज | 103 | 5488 | 5591 |
पलूस | 57 | 3774 | 3831 |
शिराळा | 567 | 7390 | 7957 |
तासगाव | 37 | 5487 | 5524 |
वाळवा | 64 | 8505 | 8569 |
एकूण | 1541 | 58523 | 60064 |