कोल्हापूरात गार्डन्स क्लब’च्या वतीने आयोजित केलेल्या ग्रीन शॉपी चे उदघाटन

कोल्हापूरः अनिल पाटील
शाहू स्मारक, दसरा चौक येथे gardens क्लब कोल्हापूर तर्फे आयोजित ग्रीन शॉपी चे आज उद्योजिका सौ पल्लवी कोरगांवकर यांच्या हस्ते बीजरोपण करून उदघाटन झाले.
प्रदर्शनात एकूण 30 स्टॉल्स असून बागेसाठी लागणारे सर्व सामान, पर्यावरणपूरक भेटवस्तू , सेंद्रिय शेतीमाल व घरगुती खाद्यपदार्थ इत्यादीं उपलब्ध आहे.
आज दुपारच्या सत्रा मध्ये डॉ मंजुषा देशपांडे यांनी ‘ पावसाळ्यापूर्वीची बागेची तयारी व वर्षभराचे व्यवस्थापन ‘ यावर विस्तृत माहिती दिली व प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम हि झाला.
देशी वाणाच्या बिया अनेक नागरिकांनी जमा केल्या.
उद्या शॉपी चा शेवटचा दिवस आहे.
20 मे हा जागतिक मधुमक्षिका दिन आहे, त्या अनुषंगाने ‘मधमाश्यांचे मानवी आयुष्यात महत्व ‘ या विषयावर मुंबई चे डॉ प्रशांत सावंत सर यांचे दृकश्राव्य माध्यमामध्ये व्याख्यान व चर्चासत्र
दुपारी 2 ते 4 या वेळेत होणार आहे.
व्याख्याने व शॉपी विनामूल्य आहेत.
तरी सर्व नागरिकांनी नक्की भेट द्यावी असे गार्डन्स क्लब च्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.