ताज्या घडामोडी
दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात लीना बनसोड यांची 21 रोजी मुलाखत
दर्पण न्यूज मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ आणि ‘जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत सोमवार दि. 20, मंगळवार दि.21, बुधवार दि. 22 आणि गुरूवार दि. 23 जानेवारी 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 21 जानेवारी 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत ऐकता येणार आहे. ज्येष्ठ निवेदक प्रसाद मोकाशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.