इचलकरंजी येथील तलाठी अमोल आनंदा जाधव याला 4 हजारांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकङले

कोल्हापूरहून ःअनिल पाटील
तक्रारदार यांचे नातेवाईक यांना इचलकरंजी येथील रिसनं ४५२ क्षेत्र ०.०.९० आर इतकी मिळकत रजिस्टर बक्षीसपत्राने २०१९ मध्ये दिलेली आहे.सदर मिळकतीचे सात बारा पञकी नांव नोंद करणेसाठी तक्रारदार यांच्या बाजूने देणेसाठी आरोपी अमोल आनंदा जाधव वय 39 पद तलाठी कसबा इचलकरंजी ता. हातकणंगले जि. कोल्हापूर. वर्ग—3 सद्या बाबासाहेब ङोळे यांच्या घरी भाङ्याने यशवंत रेसिङेंशी आर. के.नगर शाहापूर इचलकरंजी मूळगाव कोरवी गल्ली ” आगर रोङ शिरोळ जि. कोल्हापूर यांनी पाच हजार रूपये लाचेची मागणी केली होती.तडजोडीअंती स्वतः साठी 5,000/-₹ लाचेची मागणी करून4,000/-₹ लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून आरोपी यांचेविरुद्ध इचलकरंजी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे
ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती आसमां मुल्ला, पोलीस निरीक्षक
सपोफौ/ श्री प्रकाश भंडारे, पोहेकॉ/अजय चव्हाण, पोहेकॉ / श्री सुधीर पाटील,पोना/सचिन पाटील,पोकॉ/ संदीप पवार,चापोहेकॉ/विष्णु गुरव,चापोहेकॉ/सुरज अपराध आदीनीं केली.