महाराष्ट्रराजकीय

नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी अशोक काकडे

एकूण 291 मतदान केंद्रांवर होणार मतदान, मतदारसंख्या अडीच लाखाहून अधिक

 दर्पण न्यूज   सांगली /मिरज : नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 च्या अनुषंगाने जिल्ह्यातील उरूण-ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत व पलूस या 6 नगरपरिषदा तसेच शिराळा व आटपाडी या 2 नगरपंचायतींसाठी मंगळवार, दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होत असून बुधवार, दि. 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहे. मतदान व मतमोजणीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी व यंत्रणा तसेच पोलीस प्रशासनाची तयारी झाली असून मतदारानीही आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.

            सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या  6 नगरपरिषदा व 2 नगरपंचायतींमध्ये एकूण 2 लाख 57 हजार 977 मतदार असून एकूण 291 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठी मतदान केंद्रांवर एकूण 1 हजार 780, एफएसटी, एसएसटी, व्हीव्हीटी पथकांकरिता 371 तर आचारसंहिता, मीडिया कक्ष इतर अशा एकूण 785 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदान व मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

        नगरपरिषद व नगरपंचायतनिहाय एकूण मतदार व कंसात पुरूष, स्त्री व इतर मतदारसंख्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे – उरूण-ईश्वरपूर नगरपरिषद – 64215 (31871, 32340, 4), विटा नगरपरिषद – 46332 (22923, 23402, 7), आष्टा नगरपरिषद – 30573 (15361, 15210, 2), तासगाव नगरपरिषद – 32994 (16750, 16243, 1), जत नगरपरिषद – 28090 (13983, 14105, 2), पलूस नगरपरिषद – 22067 (11143, 10920, 4), शिराळा नगरपंचायत – 13095 (6561, 6533, 1), आटपाडी नगरपंचायत 20611 (10369, 10240, 2).

            नगरपरिषद व नगरपंचायतनिहाय मतदान केंद्राची संख्या व कंसात मतदान केंद्रावर प्रत्यक्ष नेमणूक करण्यात आलेले मनुष्यबळ पुढीलप्रमाणे – उरूण-ईश्वरपूर नगरपरिषद – 67 (370), विटा नगरपरिषद – 49 (295), आष्टा नगरपरिषद – 37 (205), तासगाव नगरपरिषद – 36 (230), जत नगरपरिषद – 34 (200), पलूस नगरपरिषद – 26 (200), शिराळा नगरपंचायत – 17 (105), आटपाडी नगरपंचायत – 25 (175).

            नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीमध्ये थेट नगरराध्यक्ष प्रत्येकी एक याप्रमाणे 8 नगराध्यक्ष व एकूण 181 सदस्य निवडून द्यावयाचे असून नगरपरिषद व नगरपंचायतहिनाय निवडून द्यावयाची सदस्य संख्या व कंसात प्रभाग संख्या पुढीलप्रमाणे – उरूण-ईश्वरपूर नगरपरिषद – 30 (15), विटा नगरपरिषद – 26 (13), आष्टा नगरपरिषद – 24 (12), तासगाव नगरपरिषद – 24 (12), जत नगरपरिषद – 23 (11), पलूस नगरपरिषद – 20 (10), शिराळा नगरपंचायत – 17 (17) (प्रभाग क्र. 4 सह सदस्य संख्या), आटपाडी नगरपंचायत – 17 (17).

00000

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!