राधानगरी तालूक्यातील सरवडे येथे 55 हजार रूपये किमतीच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची अज्ञाताकडून चोरी

कोल्हापूरः अनिल पाटील
घरात कोणी नसल्याने पाहून काल सौ. माधुरी संदीप जोशी यांच्या राहत्या घरात रात्रीच्या वेळी अनोळखी चोरट्यांनी प्रवेश करून घरातील बेडरूममध्ये ठेवलेली तिजोरी उघडून सोने-चांदीचे दागिने चोरून नेल्याची तक्रार राधानगरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी, सौ.जोशी यांच्या घरी कोणी नसल्याचे पाहून अज्ञान व्यक्तिने रविवारी रात्री चोरून नेण्यात आलेल्याची फिर्याद सौ.जोशी यांनी केली आहे. दागिन्यांमध्ये सोन्याची चेन, लहान मुलांचे लॉकेट व कानातील डुल, चांदीची पैजण आणि चांदीचे वाळेतोडे यांचा समावेश आहे. एकूण ५५ हजारांचा मुद्देमाल चोरीस गेलाआहे.
याबाबत फिर्यादीने राधानगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, . गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शूभांगी जठार हे करीत आहेत.