महाराष्ट्रराजकीय

सांगली जिल्ह्यात होम वोटिंगव्दारे 3 हजारहून अधिक मतदान  

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024

 

 

      सांगली : सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व 40 टक्केपेक्षा अधिक दिव्यांग असलेल्या ज्या मतदारांनी होम वोटिंगची सुविधा मिळण्याबाबत नोंदणी केली होती त्यांच्यासाठी मतदारसंघनिहाय विविध पथके नेमून संबंधित मतदाराच्या घरी जावून होम वोटिंग घेण्यात आले. ‍जिल्ह्यात 85 वर्षांवरील एकूण 3 हजार 31 ज्येष्ठ नागरिकांनी व 40 टक्केपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या 524 अशा एकूण 3 हजार 555 मतदारांनी मतदारांनी होम वोटिंगची नोंदणी केली होती. यापैकी 85 वर्षांवरील 2 हजार 931 ज्येष्ठ नागरिकांनी, 509 दिव्यांग व्यक्ती अशा एकूण 3 हजार 440 इतक्या मतदारांनी होम वोटिंग करून या सुविधेचा लाभ घेतला. अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी सविता लष्करे यांनी दिली.

       मतदारसंनिहाय होम वोटिंगसाठी नोंदणी केलेले मतदार व होम वोटिंग केलेल्या मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे.

विधानसभा मतदारसंघ र्ग होम वोटिंगसाठी नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या होम वोटिंग केलेल्या मतदारांची संख्या
281-मिरज (अ.जा.) 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक 326 313
दिव्यांग 49 45
282-सांगली 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक 272 260
दिव्यांग ६६ 62
283-इस्लामपूर 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक 234 228
दिव्यांग 48 47
284- शिराळा 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक 496 484
दिव्यांग 64 64
285-पलूस-कडेगाव 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक 311 301
दिव्यांग 45 44
286-खानापूर 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक 336 327
दिव्यांग 61 59
287-तासगाव-कवठेमहांकाळ 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक 468 461
दिव्यांग 105 104
288-जत 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक 588 557
दिव्यांग 86 84
                                 एकूण                                                                        एकूण 3555 3440

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!