फटाके नको पुस्तके वाचू अभियान ; साने गुरुजी संस्कार केंद्र भिलवडीचा उपक्रम

भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील साने गुरुजी संस्कार केंद्र भिलवडी यांचे वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी फटाके नको पुस्तके वाचू हा उपक्रम राबविण्यात येणार आहे उपक्रमाचे हे पंधरावे वर्ष आहे पर्यावरण पूरक सण या अंतर्गत हा उपक्रम राबविला जातो विविध शाळांमधून विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा दिली जाते व फटाक्यांचे दुष्परिणाम समजावून सांगितले जातात .प्रत्येक वर्षी या उपक्रमास उत्तम प्रतिसाद मिळत असतो .यावर्षी या उपक्रमा अंतर्गत साधनेचा बालकुमार दिवाळी अंक मूळ किंमत 80 रुपये हा अंक 50 टक्के सवलतीत विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे .तसेच फटाक्यांच्या पैशातून विद्यार्थ्यांनी पुस्तके घ्यावीत व वाचावीत या हेतूने विद्यार्थ्यांना बाल वाङ्मयाची सुंदर सुंदर पुस्तके देखील 50% सवलतीत संस्कार केंद्राचे वतीने देण्यात येणार आहेत दिवाळीच्या दरम्यान फटाक्यांच्यामुळे ध्वनी प्रदूषण तर होतेच पण वृद्ध लोकांना आजार होण्याची शक्यता असते. अशावेळी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे .असे मत केंद्रप्रमुख सुभाष कवडे यांनी व्यक्त केले आहे .ज्या विद्यार्थ्यांना पालकांना या उपक्रमात सहभागी व्हावयाचे आहे त्यांनी सार्वजनिक वाचनालय भिलवडी किंवा “डिसले सुपर शॉपी ” येथे पुस्तकांसाठी व अधिक माहितीसाठी संपर्क साधावा .असे आवाहन संस्कार केंद्राचे वतीने केंद्रप्रमुख सुभाष कवडे यांनी केलेले आहे.