माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांच्या हस्ते कोजागिरी साहित्य संमेलन-२०२४ लातील साहित्यिकांचा सन्मान

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील अंकलखोप (ता. पलूस) येथे माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी शब्दसूर साहित्य व सांस्कृतिक मंचच्या वतीने आयोजित कोजागिरी साहित्य संमेलन-२०२४ ला उपस्थित राहून साहित्यिकांचा सन्मान केला.
यावेळी प्रसिद्ध कवी, लेखक प्रा. इंद्रजीत भालेराव (परभणी) यांना स्व. डॉ. पतंगरावजी कदम साहित्यरत्न पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक ‘फेसाटी’ कार नवनाथ गोरे (जत, जि. सांगली) यांना स्व. कवी ज्ञानेश्वर कोळी साहित्य गौरव पुरस्कार, सुप्रसिद्ध गायक, शाहीर नंदेश उमप (मुंबई) यांना शाहीर आनंदराव केशवराव सूर्यवंशी शाहिरीरत्न पुरस्कार, ‘हत्तीचा मित्र’ आनंद शिंदे (ठाणे) यांना स्व. डॉ. बापूसाहेब चौगुले समाजरत्न पुरस्कार, व्यक्ती चित्रकार लकी गर्ग (सिमला, हिमाचल प्रदेश) यांना युथ आयडॉल पुरस्कार देऊन सन्मानित केले. इतर मान्यवरांचाही गौरव करून त्यांचे आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी अभिनंदन केले.
यावेळी आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी . शब्दसूर साहित्य व सांस्कृतिक मंचने कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून हा स्तुत्य कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल संयोजकांचे अभिनंदन केले.सामाजिक, कला, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्याची स्व. डॉ. पतंगराव कदम साहेबांनी सुरू केलेली परंपरा आजही अखंडपणे जपत असून, साहित्य व सांस्कृतिक उपक्रमांना यापुढील काळातही सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी दिली.
याप्रसंगी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे, स्वागताध्यक्ष चितळे उद्योग समुहाचे गिरीश चितळे, सांगली जिल्हा सहकारी बँकेचे संचालक महेंद्रअप्पा लाड, अंकलखोप गावच्या सरपंच सौ. राजेश्वरीताई सावंत, प्रा. सुभाष कवडे, राजेंद्र खामकर, अप्पासाहेब पाटील यांच्यासह शब्दसूर साहित्य व सांस्कृतिक मंचचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, साहित्यिक, कलावंत व मान्यवर उपस्थित होते.