सांगली येथे खासदार प्रणितीताई शिंदे यांचे स्वागत : काँग्रेस पक्षाचे नेते उद्योगपती सी आर सांगलीकर यांची उपस्थिती
सांगली ; मिरज विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे नेते उद्योगपती सी आर सांगलीकर यांनी सांगली जिल्हा कॉंग्रेस कमिटी येथे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी आलेल्या पक्ष निरीक्षका खासदार प्रणितीताई शिंदे यांचे मान्यवरांसोबत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात खासदार प्रणितीताई शिंदे यांनी सर्वांशी संवाद साधत मार्गदर्शन केले.
काँग्रेस पक्षाची विचारधारा समाजातील सर्व घटकापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने केली पाहिजे. आगामी निवडणुकीत गट-तट, आणि हेवे-दावे बाजूला सारून एकत्रितपणे लढत पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीमागे राहून काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून देण्याचे आवाहन उद्योगपती सी आर सांगलीकर यांनी केले.
सांगली जिल्हा हा काँग्रेस चा बालेकिल्ला असून गेली कांही वर्षातील पराभवाचे मळभ दूर सारत नव्या उमेदीने आणि ऊर्जेने आपला गड आपल्याला परत मिळवायचा असून त्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी संवाद साधत वाटचाल करणे गरजेचे आहे. यावेळी खा. विशालदादा पाटील, जिल्हाध्यक्ष आ. विक्रमसिंहदादा सावंत, श्रीमती जयश्रीताई पाटील,पृथ्वीराज पाटील व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.