पुणदी च्या लिपिकाचा अपघाती मृत्यू

पलूस ; किर्लोस्कर वाडी
पुणदी तालुका पलूस येथील यशवंत काशिनाथ शिक्षण संस्थेत लिपिक म्हणून कार्यरत असणारे हरिभाऊ पाटील तथा एच वाय पाटील सर यांचे आज अपघाती निधन झाले.
पुणदी येथील क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालय तसेच सावित्रीबाई फुले विद्यालय रामानंदनगर येथे त्यांनी लिपिक म्हणून कार्य केले. सोमवारी दुचाकी वरून शाळेतून घरी जात असताना शिरगांव जवळ त्यांचा अपघात झाला. त्यांना डोक्याला गंभीर इजा झाली. दोन दिवस ते मृत्यूशी झुंज देत होते. आज दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने पुणदी, रामानंदनगर येथील दोन्ही विद्यालयाच्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना शोक अनावर झाला. दोन्ही विद्यालयात पाटील सरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शालेय कामकाज थांबवण्यात आले. अतिशय मनमिळावू आणि शालेय कामकाजामध्ये हातखंडा असणारे आणि सर्वांशी हसत खेळत राहणारे, नम्र स्वभावाचे एच वाय पाटील सर अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने परिसरात सर्वांनाच मोठा धक्का बसला. उषःकाल हॉस्पिटल सांगली येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. हातनूर तालुका तासगाव येथील त्यांच्या गावी रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा, मुलगी तीन भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी सकाळी नऊ वाजता हातनुर (ता. तासगाव) येथे होणार आहे.



