प्रकल्प प्रदर्शनामध्ये डिजिटल लिटरसी विभागातून नांद्रे विद्यालय नांद्रेच्या विद्यार्थिनींचे यश
अस्मिता विद्याधर पाटील, सलोनी सुनील कोळेकर, समीक्षा संतोष पवार विद्यार्थिनींनी ॲडव्हान्स कॅल्क्युलेटर हे ऑल इन वन ॲप तयार करून तालुकास्तरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

दर्पण न्यूज मिरज,/ नांद्रे :-
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यातर्फे बुधवार दिनांक 11 /3/ 2026 रोजी सांगली जिल्हा अटल टिकरिंग लॅब अंतर्गत आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल, सांगली या ठिकाणी जिल्ह्यातील 65 शाळांमधून शिक्षक- विद्यार्थी प्रकल्प प्रदर्शन भरविण्यात आले होते. इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि डिजिटल लिटरसी या तीन विषयांचे सहा सत्रांमध्ये शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षित शिक्षकांनी आपल्या शाळेमधील विद्यार्थ्यांना संबंधित विषयाचे प्रशिक्षण दिले होते आणि प्रकल्प तयार करून घेतले होते. या प्रकल्प प्रदर्शनामध्ये डिजिटल लिटरसी विभागातून नांद्रे विद्यालय नांद्रे च्या विद्यार्थिनी कुमारी अस्मिता विद्याधर पाटील, कुमारी सलोनी सुनील कोळेकर, कुमारी समीक्षा संतोष पवार या विद्यार्थिनींनी ॲडव्हान्स कॅल्क्युलेटर हे ऑल इन वन ॲप तयार करून तालुकास्तरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
*या विद्यार्थिनींना अटल टिंकरिंग लॅब इन्चार्ज सौ. तांबोळी आर. झेड. मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.**विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आडमुठे जे. ए., पर्यवेक्षक सौ. पाटील एम. एम. ,स्कूल कमिटी सदस्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , नांद्रे ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



