राष्ट्रीय लोकअदालतीत जिल्ह्यात 6539 प्रकरणे निकाली
30 कोटींहून अधिक रकमेची वसुली
दर्पण न्यूज सांगली,: सांगली जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष अदिती उदय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आज महालोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीत 6539 प्रकरणे निकाली करण्यात आली. तसेच या लोकअदालतीच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातून एकूण 30 कोटी 29 लाख 9 हजार 639 रुपये इतक्या रकमेची वसुली करण्यात आली. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
.
या लोकअदालत प्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती उदय कदम यांनी उपस्थित पक्षकारांना जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटवून घेवून आपला मोलाचा वेळ व पैसा वाचविण्याचे आवाहन केले होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी पक्षकारांना जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटवून घेण्यास सांगून त्यांना संपूर्ण लोकअदालतीची रूपरेषाबाबत मार्गदर्शन केले होते. यावेळी जिल्हा न्यायाधीश १ व्ही. डी. निबांळकर, जिल्हा न्यायाधीश २ एस. एम. चंदगडे, जिल्हा न्यायाधीश क. ३ एस.आर. पडवळ, सांगली बार असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वाघमोडे व पदाधिकारी तसेच जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे उपस्थित होते.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार सांगली जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये महालोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीत सांगली जिल्ह्यातील 5303 दावापूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली करण्यात आली. तसेच सर्व न्यायालयातील मिळून 1236 प्रलंबीत प्रकरणे अशी एकूण 6539 प्रकरणे निकाली करण्यात आली व एकूण 30 कोटी 29 लाख 9 हजार 639 रुपये इतक्या रकमेची वसुली केली.
या लोक अदालतमध्ये सांगली मुख्यालय येथे पॅनेलप्रमुख म्हणून जिल्हा न्यायाधीश क. २ एस.एम. चंदगडे, जिल्हा न्यायाधीश ३ एस. आर. पडवळ, जिल्हा न्यायाधीश क्र. 5 श्रीमती एम.एम. पाटील, कौटुंबिक न्यायाधीश श्रीमती. एस. जे. घरात, २रे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ए.बी. शेंडगे, ५वे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ए. ए. वाळूजकर, ६ वे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पी. आर. वागडोळे, ८वे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. पी. राचकर, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती आर.एस. पाटील, ३रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती..व्ही.ए. आद्य, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर जे.एस. मकानदार, ५वे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर ओ. एस. शास्त्री, १० वे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ए. आर. कल्हापुरे यांनी काम पाहिले. तसेच कन्सिलिएटर म्हणून अॅड जे. व्ही. नवले, अॅड. मुक्ता दुबे, अॅड. श्रीमती. सुनंदा पाटील, अॅड. मोहन कुलकर्णी, अॅड. अनुराधा कुलकर्णी, डॉ. पूजा नरवाडकर, अॅड. अमित पाटील, अॅड. दिपक कदम, अॅड. विक्रम पाटील, अॅड. आश्विनी झाडबुके, अॅड. प्रशांत सोमण, अॅड. सुहास कवठेकर पॅनेल अॅडव्होकेट यांनी काम पाहिले.
ही लोकअदालत यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि.ग. कांबळे यांनी संपूर्ण लोकअदालतीचे नियोजन केले. या लोकअदालतचेवेळी पक्षकारांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक शंकरराव वानखेडे, संतोष खंदारे, नितीन आंबेकर, विजय माळी उपस्थित होते.
पुढील राष्ट्रीय लोकअदालत 9 मे 2026 रोजी आयोजित करण्यात येणार असून पक्षकारांनी यामध्ये सहभाग घेवून आपली प्रकरणे तडजोडीने मिटवून घ्यावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांच्या वतीने करण्यात आले आहे
पुढील राष्ट्रीय लोकअदालत 9 मे 2026 रोजी आयोजित करण्यात येणार असून पक्षकारांनी यामध्ये सहभाग घेवून आपली प्रकरणे तडजोडीने मिटवून घ्यावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांच्या वतीने करण्यात आले आहे