ताज्या घडामोडी

अवैध गॅस विरोधात फिरतं फथक

    दर्पण न्यूज   सांगली : घरगुती एलपीजी गॅसचे सुरक्षित वितरण व्हावे तसेच घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी नियुक्त जिल्हा स्तरावरील दक्षता व फिरते पथकांनी तपासणीचा वेग वाढवला असून, आज सांगली, मिरज, उरूण ईश्वरपूर, जतसह अनेक ठिकाणी गॅस एजन्सीची तपासणी केली. ही माहिती प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

            प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, जिल्ह्यात एलपीजी सिलिंडर वितरण आणि इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत गॅस एजन्सींची नियमित तपासणी करण्यात येत आहे. तसेच तक्रार आल्यास संबंधित एजन्सींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणतीही अफवा किंवा गैरसमज पसरवू नयेत, असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.

            सध्या जिल्ह्यात पुरेसा एलपीजी साठा उपलब्ध आहे. एचपीसीएल कंपनीचा 1713 मेट्रिक टन, बीपीसीएल कंपनीचा 94.9 मेट्रिक टन आणि आयओसीएल कंपनीचा ५८ मेट्रिक टन इतका साठा उपलब्ध असून आणखी 1195.6 मेट्रिक टन एलपीजी साठा जिल्ह्यात येण्यास मार्गस्थ आहे. त्यामुळे जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे. ऑनलाइन बुकिंग केलेल्या ग्राहकांना उपलब्धतेनुसार क्रमाने सिलिंडर वितरित करण्यात येणार असल्याचेही  स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button