मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत
दर्पण न्यूज कोल्हापूर : कागल येथील विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज सायंकाळी कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले.कोल्हापूर येथील एका विवाह सोहळ्यामध्येही मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल मतदारसंघातील विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी त्यांचे या ठिकाणी आगमन झाले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे,ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचेही आगमन झाले.
तत्पूर्वी, विमानतळावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर ,राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानतळावरील स्वागताला आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ. राजेश क्षिरसागर, खा.धनंजय महाडिक, खा.धैर्यशील माने, महापौर रूपाराणी निकम, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, जिल्हाधिकारी अमोल येडगे,महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी,पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
