महाराष्ट्रसामाजिक

प्रशासकीय यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजनांतर्गत प्राप्त निधी मार्चअखेर 100 टक्के खर्च करा : जिल्हाधिकारी अशोक काकडे

जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

           

दर्पण न्यूज मिरज/सांगली : प्रशासकीय यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजनांतर्गत प्राप्त निधी विहित मुदतीत 100 टक्के खर्च करावा. प्रस्तावित कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता, निधी मागणी, दायित्व या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही तात्काळ करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण व अनुसूचित जाती उपयोजना) संबंधी आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण बाळासाहेब कामत यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी राज्य, जिल्हा परिषद व महापालिका, नगरपालिका स्तरावरील कार्यान्वयीन यंत्रणांना निधी वितरण, वितरित निधीचा यंत्रणानिहाय खर्च आदिंचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, मार्चअखेर लक्षात घेता उर्वरित अल्प कालावधीत यंत्रणांनी आपल्याकडील 100 टक्के निधी खर्च करावा. जिल्हा नियोजन समितीतून मिळणाऱ्या निधीचा विनियोग करताना प्रशासकीय व आर्थिक शिस्त पाळावी. राज्य व स्थानिक स्तरीय यंत्रणांनी 31 मार्च 2025 पूर्वी त्यांचा संपूर्ण खर्च होईल याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, जिल्हा विकास आराखड्याच्या अनुषंगाने विकसित महाराष्ट्र विकसित जिल्हा 2029 चे नियोजन करावे. यामध्ये जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न जवळपास अडीच टक्के करण्याच्या अनुषंगाने जिल्हा विकास आराखडा व जिल्हा वार्षिक योजना यांची सांगड घालून नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण बाळासाहेब कामत यांनी यंत्रणानिहाय कामगिरीचा आढावा सादर केला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!