महाराष्ट्रसामाजिक

भिलवडी येथे स्व. काकासाहेब चितळे यांच्या जयंतीनिमित्त जायन्ट्स ग्रुप, काकासाहेब चितळे फाऊंडेशन यांच्याकडून पाणपोईची सुविधा ; रक्तदान शिबिराचे आयोजन

महाल्याब, भिलवडी शासकीय रुग्णालय, जायन्ट्स ग्रुप & सहेली ग्रुप भिलवडी मार्फत  मोफत रक्ततपासणी शिबिराचे आयोजन

 

 

दर्पण न्यूज भिलवडी :-  जायन्ट्स रत्न स्व. काकासाहेब यांच्या 84 व्या जयंतीनिमित्त जायन्ट्स ग्रुप व काकासाहेब चितळे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळ्यात पिण्याचे पाण्यासाठी पाणपोईचे भिलवडी येथे उदघाटन केले .
तसेच भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन केले होते . यामध्ये 70 लोकांनी उत्स्फूरतपणे रक्तदान केले. विशेषतः महिलांनीही रक्तदानामध्ये सहभाग घेतला .
महाल्याब व भिलवडी शासकीय रुग्णालय व जायन्ट्स ग्रुप & सहेली ग्रुप मार्फत  मोफत रक्ततपासणी शिबिराचे* ही आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये 103 लोकांनी सहभाग घेतला .यासाठी मा. गिरीश चितळे, मकरंद चितळे, भक्ती चितळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी पुण्याचे उद्योजक शेखर सहस्त्रबुद्धे अध्यक्ष बाहुबली चौगुले, सुबोध वाळवेकर, महावीर चौगुले, विशाल सावळवाडे,संभाजी महिंद,सचिन मगदूम,सुनिल परीट सहेलीच्या अध्यक्षा उज्ज्वला रीट, स्मिता वाळवेकर तसेच ग्रुपमधील सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहभाग घेतला .कार्यक्रमासाठी भिलवडी मधील वठारे गुरुजी,राजन कुलकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते .

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!