राधानगरी तालुक्यातील कासारवाङा पैकी पाटणकर येथे बांधकामावरून झालेल्या बाचाबाचीत एक जण जखमी

कोल्हापूरः अनिल पाटील
राधानगरी तालूक्यातील कासारवाङा पैकी पाटणकर येथे बांधकाम करण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत एक जण जखमी झाला. विश्वास विठ्ठल पाङळकर वय ( 69) असे त्यांचे नाव आहे. दोन दिवसापूर्वी बांधकाम करण्यावरूण वाद झाला होता. विश्वास पाङळकर यांच्या घराशेजारी त्यांच्या पूतण्याचे घर आहे. या दोघांच्यामधील जमीनीचा वाद न्याय प्रविष्ठ आहे.
ही जागा न्यायप्रविष्ठ असल्याने या जागेवर तूम्ही बांधकाम करू शकत नाही असे विश्वास पाङळकर यांनी पूतण्याला सांगायला गेले होते. न्यायालय जो निर्णय देईल त्यानंतर तूम्ही या जागेवर बांधकाम करा असे त्यांनी पूतण्याला सांगितले. त्यावेळी मला सांगणारे तूम्ही कोन म्हणून रविवारी दोघांच्यामध्ये बाचाबाची झाली होती. या बाचाबाचीत ते जखमी झाले होते. त्यांच्या हाताला मार लागल्याने त्यानां पूढील उपचारासाठी सी पी. आर रूग्णालय कोल्हापूर येथे पाटविण्यात आले आहे. या घटनेची नोंद सी पी आर पोलिस चौकीत झाली आहे.