महाराष्ट्र
अंकलखोप येथे अंकलखोप काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदीप पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

भिलवडी ; सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील अंकलखोप येथे अंकलखोप काँग्रेस कमिटीच्या वतीने डॉ पतंगरावजी कदम साहेब खरेदी विक्री संघाचे माजी संचालक, काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रदीप पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष घनश्याम सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रदीप पाटील यांच्या सत्कार करण्यात आला. या वाढदिवस प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब सुर्यवंशी , उद्योजक सतीश आबा पाटील, मार्केट कमिटीचे संचालक सुदीप गडदे, अंकलखोप सहकारी सोसायटीचे चेअरमन विशाल सूर्यवंशी, व्हॉइस चेअरमन विजय पाटील, गजाभाऊ सूर्यवंशी, पुरुषोत्तम जोशी शेतकरी संघटनेचे जयकुमार कोले, सचिन जाधव, डॉ विश्वजीत कदम यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे अधिकारी राहुल पाटील, पत्रकार अभिजीत रांजणे आदी मान्यवर उपस्थित होते.