आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माजी सहकार मंत्री कै. डॉ पतंगराव कदम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भिलवडी येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप

आमदार डॉ विश्वजीत कदम यांचे मार्गदर्शन अन् पुढाकार : सामाजिक उपक्रमांचे लोकांतून कौतुक

 

 

भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे  माजी सहकार मंत्री  कै डॉ पतंगरावजी कदम यांच्या स्मृती प्रीतर्थ आमदार डॉ विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शैक्षणिक संस्थेच्या विद्यार्थ्यांना वह्या  वाटप करण्यात आल्या. या सामाजिक उपक्रमाचे अनेक लोकांतून कौतुक होत आहे.

विद्यार्थी शिकला पाहिजे घडला पाहिजे, गरिबांचा विद्यार्थी मोठा झाला पाहिजे, या भावनेतून कै. डॉ. पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठ उभारले. माझ्या वाढदिवसाला पुष्पगुच्छ,भेटवस्तू नको तर एखादी वही म्हणून भेट द्या, असा अट्टाहास डॉ. पतंगरावजी कदम यांचा असायचा. ही वही एखाद्या विद्यार्थ्याला पडत्या काळात सहकार्य करेल. अशी भावनाही  त्यांची असायची. त्यांचाच आदर्श घेत माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी भिलवडीतील विविध शैक्षणिक संस्थे च्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्या. या वहीच्या मुखपृष्ठावर आणि मलपृष्ठावर डॉ पतंगरावजी कदम यांनी दिलेले थोर संदेश नक्कीच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ठरतील. तसेच आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनीही या वही मधून चांगला संदेश दिला आहे.

भिलवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भिलवडी शिक्षण संस्थेचे खाजगी प्राथमिक शाळा,  इंग्लिश मीडियम स्कूल,  भिलवडी सेकंडरी स्कूल येथील विद्यार्थ्यांना या वाटप करण्यात आल्या.

यावेळी उद्योगपती  गिरीश चितळे, भिलवडी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ चोपडे ,संचालक चंद्रकांत पाटील ,वाठारे गुरुजी, सचिव मानसिंग हाके, सरपंच विद्याताई पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम दादा पाटील, माजी उपसरपंच मोहन तावदर, सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस बी डी पाटील, दीपक पाटील, आमदार डॉ विश्वजीत कदम  जनसंपर्क कार्यालय भिलवडी चे सुहास अरबुणे, दर्पण न्यूज चे मुख्य संपादक अभिजीत रांजणे, भिलवडी शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक, उप मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पत्रकार, ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!