भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचा २९ वा वर्धापनदिन उत्साहात
चितळे उद्योग समूहाचे उद्योगपती गिरीश चितळे यांची उपस्थिती
भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचा २९ वा वर्धापनदिन प्रमुख पाहुणे श्री. सदाशिव तावदर – संचालक , भिलवडी शिक्षण संस्था भिलवडी यांच्या उपस्थितीत व डॉ. बाळासाहेब चोपडे – उपाध्यक्ष , भिलवडी शिक्षण संस्था ,भिलवडी . यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न करणेत आला. यावेळी संस्थेचे संचालक गिरीश चितळे , महावीर वाठारे , चंद्रकांत पाटील ,अशोक धोंडी चौगुले , प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे प्रा. डॉ. एस.डी . कदम उपस्थित होते .
मनोगत व्यक्त करतांना संस्थेचे संचालक गिरीश चितळे म्हणाले की, कोणतीही गोष्ट करत असताना स्वतःची क्षमता ओळखून स्वतःची प्रगती करावी. जीवन जगत असतांना चांगले घेण्याची अपेक्षा ठेवली पाहिजे . आपले अधिकार काय आहेत आणि आपण काय घेतले पाहिजे तसेच आपले हक्क व अधिकार कोणते आहेत . नागरिक म्हणून आपली कोणती कर्तव्ये व हक्क आहेत हे कळण्यासाठी चांगल्या प्रकारचे शिक्षण घ्यायला हवे . शिक्षण घेताना ते कोणत्याही बंधनात न अडकता मुक्त संचार करता येणारे शिक्षण घेता आले पाहिजे . आपणास वैचारिक स्वातंत्र्य , शिक्षण स्वातंत्र्य , व्यक्ति स्वातंत्र्य घटनेने दिलेले आहे . म्हणून व्यक्ति स्वातंत्र्याचा वापर करून स्वावलंबी जीवन जगण्याचा प्रयत्न करा . यासाठी आपले समाजसुधारक व शास्रज्ञ आणि विचारवंत यांचा आदर्श घ्या . कोणतीही गोष्ट करताना गरज लागली की निर्माण करण्याऐवजी त्यापूर्वी करा असे ते म्हणाले .
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष , भिलवडी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष , डॉ. बाळसाहेब चोपडे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, भिलवडी शिक्षण संस्था स्थापन झाल्यापासून आजपर्यंत अनेक आदर्श विद्यार्थी घडविलेले आहेत. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून संस्थेचा नावलौकीक सातासमुद्रापार घालवावा असे ते म्हणाले
या २९ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या मैदाना भोवती उपाध्यक्ष मा. डॉ. बाळासाहेब चोपडे , संचालक , गिरीश चितळे , सदाशिव तावदर , महावीर वाठारे , अशोक धोंडी चौगुले , चंद्रकांत पाटील , संजय मोरे – मुख्याध्यापक , सेकंडरी स्कुल अँण्ड ज्युनिअर कॉलेज भिलवडी , सुकूमार किणीकर – मुख्याध्यापक खाजगी मराठी प्राथमिक शाळा , भिलवडी , प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करणेत आले .
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक आणि २८ वर्षाचा महाविद्यालयाच्या वाटचालीचा आढावा प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे यांनी घेतला . सूत्रसंचालन डॉ. सुरेश शिंदे यांनी केले तर आभार डॉ. एम.आर.पाटील यांनी मानले . या कार्यक्रमास कला व विज्ञानविभागातील सर्व विद्यार्थी विद्यार्थांनी प्राध्यापक बंधू भगिनी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .