रामानंदनगर येथील विविध प्रश्नांकरिता आमीर पठाण यांचे आंदोलन
रामानंदनगरात किर्लोस्कर कंपनी चा टॅक्स गावच्या विकासासाठी खर्च करा
पलूस: रामानंदनगर तालुका पलूस येथील गावची पाणीपट्टी 90 लाख रूपये एवढी आहे. पंधरावा वित्त आयोगामध्ये असणारी रक्कम पाणीपट्टी करिता वर्ग करावी तसेच कामगार भवन जवळील बापू वाडी येथील राहणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात याव्यात या मागणीकरिता रामानंदनगर येथे डॉ. पतंगराव कदम व्यासपीठ येथे भारतीय जनता पार्टीचे पलूस कडेगाव चे अल्पसंख्यांक मोर्चा चे अध्यक्ष अमीर पठाण यांनी ठिय्या आंदोलन केले आहे. त्यांच्यासोबत बापू वाडी येथील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. रामानंदनगर गावची पाणीपट्टी 90 लाखावर असून थकीत पाणीपट्टी ची रक्कम पंधराव्या वित्त आयोगातून भरण्यात यावी याबाबतचे पत्र तालुका पाणीपुरवठ्याचे अधिकारी यांनी ग्रामपंचायतीला दिले होते, तीच मागणी अमीर पठाण घेऊन आंदोलन करीत आहेत. विस्कळीत पाणीपुरवठा गावाला होतो.दररोज पाणी येत नाही. किर्लोस्कर कंपनीचा कर रुपी आलेला वीस लाख रुपये चा टॅक्स गावच्या विकासासाठी खर्च करण्यात यावा, बापूवाडी येथील इराणी आणि डवरी समाजातील जे लोक राहतात.त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून अनेक आजार त्यांना निर्माण झालेले आहेत.कुत्री डुकरांचा वावर वाढला आहे.लहान मुलांच्या अंगावर फोड आले आहेत.पावसाचे दिवस असल्याने त्यांच्या झोपड्या मध्ये पाणी साचले आहे.घाणीचे साम्राज्य आहे.जंतू किडे वळवळ करताना उघड्या डोळ्यांना दिसत आहेत परंतु रामानंद नगर ग्रामपंचायत तिकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यांना पाणी,लाईट,स्वच्छतेची सुविधा,आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच मुरूम टाकून देणेत यावा. औषध फवारणी करावी. आरोग्य तपासणी करावी.खडी टाकून दलदल दूर करावी . किर्लोस्कर कंपनी चे रेल्वे चे सांडपाणी पावसाचे पाणी त्यांच्या झोपड्या मधून जात आहे.ती बाहेरून करण्यात यावी. अशा स्वरूपाच्या मागण्यासह इतर मागण्याकरिता हे आंदोलन सुरू आहे. यावेळी अनेक मान्यवरांनी भेटी घेऊन त्यांना पाठिंबा व्यक्त केला. आंदोलनाच्या दखल घेऊन मागण्या मान्य व्हाव्यात असे निवेदन पलूस चे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.