आमणापूर येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या आडसाली ऊस लागवड तंत्रज्ञान विषयी चर्चासत्रास उत्स्फूर्त प्रतिसाद
महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय पलूस व क्रांती अग्रणी डॉ .जी डी बापू लाड सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुंडल यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन
पलूस: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील आमणापूर येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय पलूस व क्रांती अग्रणी डॉ .जी डी बापू लाड सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुंडल यांच्या संयुक्त विद्यमाने आडसाली ऊस लागवड तंत्रज्ञान विषयी चर्चासत्र संपन्न झाले, यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कारखान्याचे ऊस विकास अधिकारी विलास जाधव यांनी उसाचे एकरी शंभर मे.टन उत्पादन या अंतर्गत उसाची सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञान तसेच योग्य जातीची निवड व ऊस लागवड तंत्रज्ञान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कृषी सहाय्यक प्रांजली पाटील यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. एकात्मिक फलोत्पादन योजनेअंतर्गत ड्रॅगनफ्रुट लागवड ,फुल पिकांमध्ये सुट्ट्या फुलांकरिता अनुदान आहे. सामूहिक शेततळे खुदाई अस्तरीकरण, यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टर, पावर टिलर,एमबी नांगर, कल्टीवेटर ,डिस्क नांगर ,हेरो रिझर याकरिता अनुसूचित जाती, जमाती महिला व सीमांत शेतकरी यांचा लाभ घेऊ शकतात तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना याविषयी सविस्तर माहिती दिली व महाडीबीटी या पोर्टलवर जास्तीत जास्त शेतकरी यांनी ऑनलाईन अर्ज करावीत असे आवाहन प्रांजली पाटील यांनी केले.पीकविमा प्रतिनिधी श्री संग्राम कणसे यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजने विषयी माहिती दिली व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा उतरावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी सरपंच सौ बालिका पाटील ,श्री आकाराम भाऊ पाटील, श्री ज्ञानेश पाटील, प्रफुल्ल पाटील व अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार कार्यकारी संचालक श्री आप्पासाहेब कोरे यांनी मानले.