महाराष्ट्र
भिलवडी येथील हौसाबाई हराळे यांचे निधन
भिलवडी केंद्राचे माजी केंद्रप्रमुख मारुती हराळे यांना मातृशोक

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील हौसाबाई बापू हराळे (वय 104) यांचे दिनांक 24 रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.
रक्षा विसर्जन कार्यक्रम शुक्रवार दिनांक 26 रोजी सकाळी 9 :30 वाजता भिलवडी येथील कृष्णा नदीच्या घाटावर आहे.
त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते भिलवडी केंद्राचे माजी केंद्रप्रमुख मारुती हराळे, धनगर समाज संघटना भिलवडीचे माजी अध्यक्ष तातोबा हराळे, सुभेदार मेजर दत्तात्रय हराळे यांच्या मातोश्री होत.