विशाल गडावरील झालेला प्रकार व प्रार्थना स्तरावरील हल्ला चुकीचा : भीम आर्मी संविधान रक्षक बलचे जिल्हाध्यक्ष जमीर शेख

मिरज :
विशाल गडावरील झालेला प्रकार व प्रार्थना स्तरावरील हल्ल्याचा प्रकार चुकीचा आहे, भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांनी निवेदनात सांगितले.
भीम आर्मी संविधान बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना मिरजेचे प्रांत उत्तम दिघे साहेब यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले यावेळी मिरजेचे प्रांतानी भीम आर्मीच्या कार्यकर्त्या सोबोत सविस्तर चर्चा केली व वरील स्तरावर निवेदन पाठवून समाजकंटकावर कारवाई करण्यात येईल असे कार्यकर्त्यांना मिरज प्रांत साहेबनी आश्वासन दिले यावेळी भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख म्हणाले की प्रक्षोब भाषणे व चीतावणी देणारे तसेच विशालगड व परिसरात जमाव बंदीचे आदेश असताना देखील मोठ्या प्रमाणात जमाव जमवून काही समाजकंटकांनी जातीय सलोखा बिघडवण्याचा व सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा सर्व समाजकंटकांना मोकांतर्गत कारवाई करून जिल्हातू हद्दपार करावे भारत देशात कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी समान कायद्याची व्यवस्था केलेली आहे. सर्वांसाठी संविधान दिलेले आहे. जे कायदा मानणार नाही अशांना कायद्याचे धाक दाखवणे जरुरी आहे , यावेळी जमीर शेख म्हणाले. यांच्याबरोबर साद गावंडी,जैन सय्यद,ऐजाज खान,सोहेल कनवाडे, व शाबाद सय्यद सह कार्यकर्ते उपस्थित होते होते