महाराष्ट्र

सूर्यगाव येथे ऊस पिक चर्चासत्र संपन्न

महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय पलूस, क्रांती अग्रणी डॉ.जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लि. कुंडल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

 

पलूस : सांगली जिल्ह्यातील सुर्यगाव तालुका पलूस येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय पलूस व क्रांती अग्रणी डॉ.जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना लि. कुंडल यांच्या संयुक्त विद्यमाने आडसाली ऊस लागवड तंत्रज्ञान विषयी चर्चासत्र संपन्न झाले.
क्रांती कारखान्याचे ऊस विकास अधिकारी विलास जाधव यांनी ऊसाचे एकरी शंभर मे. टन उत्पादन या अंतर्गत ऊसाच्या योग्य जातीची निवड, प्रचलित ऊस जाती, नवीन ऊस जाती तसेच ऊस पिकातील कोळी किड नियंत्रण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
मंडळ कृषी अधिकारी पलूस श्री संजयकुमार खारगे यांनी सोयाबीन पिकाच्या विविध जाती बीज प्रक्रिया कीड रोग व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती दिली तसेच कृषी सहाय्यक संतोष चव्हाण यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले अर्ज महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन करावेत व शासकीय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
भारतीय विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी संग्राम कणसे यांनी एक रुपयात पिक विमा याबाबत सविस्तर माहिती दिली व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा पिक विमा उतरवावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी क्रांती कारखान्याचे संचालक शीतल बिरनाळे भीमराव देसाई अमोल सूर्यवंशी वैभव यादव व अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयकर मुळीक सचिन सूर्यवंशी यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे आभार संतोष सूर्यवंशी यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!