बैल पोळ्यासाठी, बैलांचा दयाळूपणे सन्मान करण्यारे चार मार्ग : ॲनिमल राहत

महाराष्ट्र,- आगामी बैल पोळ्याच्या आधी, ॲनिमल राहतने एक बहुआयामी मोहीम सुरू केली आहे, ज्यामध्ये बैलांच्या मालकांना बैलाची शिंगे तासने, रासायनिक रंग लावणे, नाकात दोरी बांधणे आणि दुतर्फा बांधणे टाळून त्यांच्या बैलांचा दयाळूपणाने सन्मान करण्यास प्रोत्साहित केले जात आहे. या बाबत ॲनिमल राहतचे सदस्य महाराष्ट्रातील कार्य करत असलेल्या सर्व क्षेत्रांमध्ये मार्गदर्शक तक्ते (पोस्टर्स) मार्फत जनजागृती तसेच बैलांना चांगले आरोग्य आणि आराम मिळावा यासाठी चार सोपे बदल स्वीकारण्याचे आवाहन गावातील पशु मालकांना प्रत्यक्ष भेटून करत आहेत.
कृत्रिम सजावटीमागे लपलेले काही धोके आहेत : शिंगे तासणे आणि रासायनिक रंग हे बैलांच्या कर्करोगाशी निगडीत आहेत कारण ते शिंगाच्या अंतर्गत थराला हानिकारक अतिनील किरणोत्सर्ग आणि शिशाच्या संपर्कात आणतात आणि बैलांच्या शरीरावर रासायनिक रंग वापरल्याने त्वचेची ऍलर्जी आणि वेदनादायक जळजळ होऊ शकते सतत खाज सुटते . बैलाचे आयुष्य कमी होते . त्याऐवजी,ॲनिमल राहत बैलपोळ्या वेळी बैलांना सुशोभित करण्यासाठी झूल,हळद किंवा रंगीबेरंगी फिती आणि नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचे आवाहन करत आहे. वेदनादायक नाकाच्या दोरीच्या (वेसन) जागी म्होरकी वापरण्याचे आणि बैलांना नेहमी वेसनीला बांधण्याऐवजी म्होरकीला एका दाव्याने बांधण्याचे आवाहन करत आहेत कारण त्यामुळे अंगावर बसलेली माशी दूर करण्यासाठी बैलाला त्याचे डोके आणि मान हलवण्यासाठी पुरेशी मोकळीक मिळते.
“पशु मालकांनि हे लक्षात घ्यायला हवे की शिंगे तासणे आणि रासायनिक रंग वापरणे यांसारख्या प्रथांमुळे बैलांना तसेच इतर पशूंना त्रास होऊ शकतो आणि ते जीवघेणे ठरू शकते,”
ॲनिमल राहतचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश उप्रेती म्हणतात. “अॅनिमल राहत बैल पोळा साजरा करणार्या प्रत्येकाला त्यांच्या बैलांना केवळ सणासाठीच नव्हे तर वर्षभर त्यांना त्रास देणार्या आणि हानी पोहोचवणार्या प्रथा टाळून आणि त्यांना निरोगी आणि आरामदायी ठेवण्यासाठी त्यांच्या बैलांबद्दल सहानुभूती दाखवण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.”
गेल्या कित्येक वर्षांपासून बैल पोळ्या दरम्यान रासायनिक रंग आणि शिंगे तासणे यांचा वापर दूर करण्यासाठी ॲनिमल राहत थेट स्थानिक पशु मालकांसोबत काम करत आहे. चालु वर्षी, ॲनिमल राहत सांगली जिल्हातील २४ गावांमधील आणि ३ जनावर बाजारातील पशु मालकांना सहकार्य करत आहे आणि याचा फायदा बैल, गायी, वासरे, म्हैस, बकऱ्यांना वेदनादायक शिंग तासणे आणि विषारी पेंटने रंगवणे यासारख्या प्रथांच्या हानिकारक प्रभावांपासून वाचवत आहे.
अधिक माहितीसाठी आणि Animal Rahat च्या जीवन वाचवण्याच्या कार्याला पाठिंबा देण्यासाठी, कृपया AnimalRahat.com या संकेतस्तळाला भेट द्या.
संपर्क:
श्री शशिकर भारद्वाज +91 9552592048; ShashikarB@animalrahat.com
डॉ नरेश उप्रेती +91 9552552042; NareshU@animalrahat.com