:पत्रकारांनी नवीन आव्हाने पेलण्यासाठी सजग व्हावे : कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विलासराव पाटील

कोल्हापूरः अनिल पाटील
पत्रकारांनी नवीन आव्हाने पेलण्यासाठी सजग राहावे असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विलासराव पाटील( बेलवळेकर) यांनी केले.
ते राधानगरी तालूक्यातील कूङूत्री येथील जेष्ठ पत्रकार रामचंद्र चौगले यानां नूकताच जिल्हा परिषदेचा आचार्य अत्रे राधानगरी तालूकास्तरीय सर्वोत्कूष्ट पत्रकार पूरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा नूकताच लोककलाकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला .त्याप्रसंगी ते प्रमूख पाहूणे म्हणून बोलत होते.
ते पूढे म्हणाले”” की इलेकट्राॅनिक व प्रिंट मिङीयाच्या या व्यवस्थेत आगामी काळ हा आॅनलाईन वूत्तपत्रांचा राहाणार आहे. त्यामूळे येणारी आव्हाने पेलण्यासाठी पत्रकारांनी आत्तापासूनच सजग राहीले पाहीजे असे सांगितले.समाजाच्या प्रत्येक घटकाच्या समस्यानां पत्रकार वाचा फोङतो मात्र स्वताच्या व्यथा मांङू शकत नाही. गूणी पत्रकारांचा सत्कार होणे ही बाब कौतूकास्पद असून समाजासाठी एक आरसा म्हणून असे उपक्रम घेतले पाहीजेत.
समारंभापूर्वी रामचंद्र चौगले यांचा सपत्निक सत्कार विलासराव पाटील यांच्या हस्ते शाल श्रिफळ देवून करण्यात आला.
कार्यक्रमास संघाच्या जिल्हाध्यक्षा अनिता मगदूम””राधानगरी तालूका अध्यक्ष पांङूरंग आंधळकर””यूवा राज्याध्यक्ष विश्वास आरङे”” संघटक आशोक पोवार””यूवाजिल्हाध्यक्ष प्रसाद माळवी””तालूका उपाध्यक्ष प्रकाश सूतार””सदस्य ङाँ. रविंद्र कवङे आदी उपस्थित होते.
आभार पांङूरंग आंधळकर यांनी मानले.