महाराष्ट्र

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या टीमने भिलवडीसह परिसरात पूरपरिस्थितीबाबत घेतला आढावा : तालुका प्रशासकीय अधिकारी यांची उपस्थिती

प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून अनेक गावांची पाहणी

 

भिलवडी :
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सांगली व. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं), जिल्हा परिषद, सांगली यांनी, पलूस तालुक्यातील पूरबाधित गावांना भेट देवून, गावातील लोकांकडून, येणाऱ्या पावसाळयामधील संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने शुक्रवारी
माहिती व आढावा घेतला.

यावेळी आपत्ती कालीन परिस्थितीमध्ये पूर बाधित गावांमध्ये असलेल्या बोटी / सुरक्षा किट सुस्थितीत आहेत का? याची खात्री केली. तसेच भिलवडी येथे कृष्णा नदीमध्ये स्वतः बोटीमध्ये बसून, त्याबाबतचे प्रात्यक्षिक घेतले. पूर परिस्थिती उद्भवल्यास त्यास सक्षमपणे सामोरे जाता येईल अशी तयारी प्रशासनाने केली असल्याचे मत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सांगली यांनी व्यक्त केले.

पूरबाधित गावांमध्ये आरोग्य, पशुधन, शासकिय इमारती, धोकादायक इमारती तसेच पिण्याचे पाणी इत्यादी बाबत आढावा घेवून, मार्गदर्शन केले. कोणत्याही गावांत अपरिहार्य कारणाशिवाय, पूरामध्ये बोट सोडण्याची आवश्यकताच भासू नये याकरीता, गावातील लोकांनी पूर परिस्थिती निर्माण होताच, आपले पशुधन व जीवनावश्यक वस्तू घेवून, नियोजित केलेल्या अथवा सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे अशा सूचना देवन, अशी प्रशासनाची अपेक्षा असलेचे मत व्यक्त केले.

या अनुषंगाने तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांची आढावा बैठक पंचायत समिती, पलूस येथे घेण्यात आली. त्यामध्ये गावातील पूरबाधित कुटूंबे व पशुधन यांचा सर्व्हे करून त्याच्या यादया अद्यावत करणेत याव्यात. तसेच धोकादायक इमारती असणारी कुटुंबे त्वरीत स्थलांतरीत व्हावीत याकरीता, आपत्ती व्यवस्थापन समिती मार्फत त्वरीत कार्यवाही करावी, गावातील गरोदर माता, दुर्धर आजार असणाऱ्या व्यक्ती, दिव्यांग२४ व्यक्ती, वय वर्षे ८५ वरील जेष्ठ नागरिक यांना त्वरीत नियोजित ठिकाणी स्थलांतरीत करावे अशा सूचना दिल्या,

तसेच आपत्ती कालीन परिस्थिती हाताळणे सुलभ व्हावे याकरीता, गाव पातळीवर काम करणारे सर्व कर्मचारी यांनी मुख्यालयी रहावे. आपले मोबाईल फोन २४ तास सुरू ठेवावेत. तसेच कोणत्याही कर्मचाऱ्यास आपत्ती कालीन परिस्थितीत रजा दिली जाणार नाही. आपत्ती कालावधीत दुर्घटना घडल्यास त्यास आपणास जबाबदार धरणेत येवून प्रशासकिय कारवाई करणेत येईल अशा सूचना मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं), जि.प. सांगली व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सांगली यांनी दिल्या.

यावेळी भिलवडी गावच्या सरपंच व इतर पदाधिकारी तसेच तालुक्यातील गटविकास अधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकारी या बैठकीला उपस्थित होते

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!