भोगावती महाविद्यालयाचे प्रा.टी.एस. पाटील यांना भौतिक शास्त्रातील डॉक्टरेट

कोल्हापूरः अनिल पाटील
भोगावती महाविद्यालय, कुरुकलीचे प्राध्यापक व कावणे (ता.करवीर)गावचे सुपुत्र टी.एस. पाटील यांनी “भौतिकशास्त्र “या विषयात शिवाजी विद्यापीठाची पी.एच. डी. पदवी प्राप्त केली.
त्यांनी *”स्टडीज ऑन डोपड मॅगनिज ऑक्साईड थिन फिल्म्स फॉर सुपरकॅपॅसिटर अँप्लिकेशन “** या विषयावर प्रबंध सादर केला. त्यांना डॉ. सतीश गंगावणे, डॉ. मानसिंग टाकळे, वरिष्ठ प्राध्यापक डॉ.केशव राजपुरे, डॉ. निलेश तरवाळ, डॉ. राहूल बी.पाटील
व डॉ. किशोर गुरव यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच त्यांना भोगावती महाविद्यालयाचे अध्यक्ष, संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. धनाजी चौगले,उपप्राचार्य डॉ. एन. एम. पाटील, डॉ. रविराज कांबळे, डॉ. विजय कोठावळे, डॉ.संदिप पाटील, प्रा. संदीप निकम, सर्व प्राध्यापक तसेच व श्री. एन. एस. पाटील सर (केंबळी) यांचे प्रोत्साहन व सहकार्य लाभले.
त्यांच्या या उज्वल यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून भोगावती कॉलेज तसेच अनेक मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला.