ताज्या घडामोडी

महाराष्ट्र शासनातर्फे हिंद- दि-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचे आयोजन 28 फेब्रुवारी व 1 मार्चला नवी मुंबई येथील ओवे मैदान, सेक्टर २९, खारघर येथे होत आहे. 350 व्या शहीदी समागमानिमित्त विशेष लेखमाला..

                                                                                                                                                                                                  सहिष्णुतेची बीजे पेरणारा ‘एक ओंकार’

विशेष लेख

कोणत्याही भूभागावर होणारे आक्रमण हे तेथील संस्कृतीवर, धार्मिक अटल निष्ठांवर असते. अशा आक्रमणांना शौर्याच्या गाथेत मोजता येणार नाही. संस्कृतीवर आक्रमण होते तिथे शौर्य नाही तर क्रौर्य म्हणूनच याकडे पाहिले पाहिजे. आपल्या भारताचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा उत्तरेतील विशेषत: सिंध प्रांत, पंजाब, काश्मिर यापाठोपाठ राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, पूर्वेतील राज्य व इतर भूभाग आपल्या डोळ्यासमोर येतात.

भारताच्या उत्तर सीमेपूरता विचार केल्यास आपल्याला अकराव्या-बाराव्या शतकात डोकावून पहावे लागेल. इसवी सन 712 मध्ये मुहम्मद बिन कासिम याने सिंध प्रदेशावर मोठे आक्रमण केले. हा एक अरब लष्करी सेनापती होता. त्यानंतर कासिमने सिंध आणि मूलतान काबीज केले. सिंधवरील अरब आक्रमणानंतर अकराव्या शतकात तुर्क लोकांनी भारतावर आक्रमण केले. यानंतर गजनीच्या महमुदने भारतावर आक्रमण केले. अनेक स्वाऱ्या करुन त्यानी नगरकोट, मथुरा, कनोज आणि ग्वालेरला लुटले. 1025 मध्ये महमुदने काठीयावाडच्या सोमनाथ शिव मंदिरावर आक्रमण केले. पुढे महम्मद घोरी, तैमूर, कुतुबुद्दीन असे सूलतान झाले.

1296 च्या कालावधीत अलाऊद्दीन खिलजी याने दख्खन प्रांतात प्रवेश करुन यादवांची संपत्ती लूटली. मलिक कपूर याने 1310 मध्ये यादवांची सत्ता लयाला लावली. पुढे 1324 ते 1350 याकाळात मुहम्मद तुघलक या दिल्लीच्या सूलतानाने आपली सत्ता दक्षिणेतल्या मदुराई पर्यंत नेली. याची सत्ता क्षीण झाल्यावर अल्लाउद्दीन हसन बहमनी याच्या नेतृत्वाखाली 1347 मध्ये बहमनी घराणे उदयास आले. आपल्या महाराष्ट्रातील देवगिरी अर्थात दौलताबाद हे त्याचे काही काळ राजधानीचे ठिकाण होते. त्या खालोखाल 16 शतकात गोवळकोंडयाची कुतूबशाही, विजापूरची आदिलशाही, बिदरची बरीदशाही आणि वराडची इमादशाही अशी पाच राज्यात विभाजीत झाली. भारतात बाबरपासून औरंगजेबच्या काळापर्यंत झालेल्या अनेक अत्याचारांच्या आठवणी येथील प्रत्येक भूभागावर कोरलेल्या आहेत.

भारतावरील आक्रमाणांची ही मालिका डोळ्यापुढे ठेवली तर या आक्रमणांमध्ये उद्वस्त झालेल्या लोकांची मानसिकता ही आपल्या शौर्यातून प्रतिकारासह सहिष्णुतेकडेही अधिक झुकलेली दिसते. रोजच्या आक्रमणांना कंटाळून अहिंसेच्या तत्वावर जैन धर्माचा उदय झाला. याच सहिष्णुतेच्या मूल्यांना अधोरेखित करुन पंधराव्या शतकात गुरुनानकजी यांनी शिख धर्माची स्थापना केली.

मुघलांनी मोठ्या प्रमाणात धर्मावरील अतिक्रमण केले. यात शिखांच्या गुरुंवरील मुघल शासकांकडून केलेल्या अत्याचारांबाबत इतिहासातील पाने वाचतांना अंगावर शहारे येतात. परमेश्वर हा एक आहे आणि गुरुगंथसाहिब हा त्याचा पवित्र ग्रंथ आहे अशी श्रध्दा शिख धर्मियांमध्ये आहे. गुरु नानक हे शिखांचे पहिले गुरु. लाहोर जवळ तळवंडी अर्थात नानकानासाहिब या गावात त्यांचा जन्म झाला. भक्तीरसासाठी आवश्यक असलेल्या भजनांच्या माध्यमातून, शबद किर्तनाच्या माध्यमातून गुरुबाणी मधील गुरुंनी दिलेल्या शिकवणींचे नित्य स्मरण शिख धर्मिय करतात.

शिखांच्या गुरु नानकदेव, गुरु अगंददेव, गुरु अमरदास, गुरु रामदास, गुरु अर्जूनदेव, गुरु हरगोविंद, गुरु हरराए, गुरु हरकिशन, गुरु तेगबहादूर आणि दहावे गुरु गोविंदसिंग यांनी आपल्या शिख अनुयायांना अध्यात्मीकतेचा मार्ग दिला. लोकांच्या हिताकरीता देशासाठी आणि धर्मासाठी, धर्मातील मानवी मूल्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करतात तसेच शिख मर्यादानुसार आपले जीवन व्यतीत करतात त्यांना खालसा म्हणतात. येथे सगूण देवदेवता तसेच सैतानाची शक्ती यांच्या अस्तित्वाला मान्यता नाही. सर्व चराचराची निर्मिती ही परमेश्वराची निर्मिती असून तो सर्व ठिकाणी आहे. तो स्वयंभू आहे अशी धारणा शिख धर्माची आहे. परमेश्वराने सत्व, रज व तम हे तीन गुण निर्माण केले आहेत.

जीवन हे पापयुक्त नसून त्याचा उगम पवित्र आणि शुध्दतेत असल्यामुळे यात केवळ सत्याचा वास असल्याचे शिख धर्म मानतो. औरंगजेबाच्या काळात शिख धर्मगुरुंनी क्रुर अत्याचार सहन करुनही आपल्या सहनशक्तीला क्रौर्यातून प्रतिकार करण्याचे बांध फुटू दिले नाहीत.

भारतपर्वातील इतिहासाच्या या पाऊलखूणा सहिष्णुतेचे बळ घेऊन नव्या पिढीपर्यंत पोहोचाव्यात यासाठी महाराष्ट्र शासनाने हिंद दी चादर श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी शताब्दी समारोहानिमित्त संपूर्ण राज्यात विविध ठिकाणी जाहीर कार्यक्रम घेण्याचे निश्चित केले.

भारतीय संस्कृती संपवण्याचा मुघलांचा अट्टहास होता. या काळात गुरु तेगबहादूर साहिबजी व शिख समाज ढाल बनून पुढे आला या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील कार्यक्रमात गौरोद्गार काढले. मानवता, सत्य आणि धर्म रक्षा यासाठी गुरु तेगबहादूर साहिबजी यांचे योगदान मोलाचे आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे जाहीर कार्यक्रमात सांगितले. ज्या देशाने सर्व विचार प्रवाहांचा, विविधतेचा, धर्म, जात, पंथाचा सन्मान केला त्या भारतावर मुघलानी आक्रमण करुनही, प्रचंड अत्याचार करुनही यातील सौहार्दता कोणीही नष्ट करु शकले नाही, असे संत ज्ञानी हरनामसिंग यांनी नमूद केले आहे. एवढ्या साऱ्या आक्रमणांच्या आव्हानाला सहिष्णुतेने परतवून लावणारा हा एक ओंकार म्हणून शिख धर्माच्या शिकवणुकीकडे आपण पाहिले पाहिजे.

– विनोद रापतवार

जिल्हा माहिती अधिकारी,नागपूर

00000

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!