दुधोंडी वसंतनगर येथील संरक्षक ग्रील मागणीला यश : जे के बापू जाधव यांचा प्रयत्न

दुधोंडी:- *सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील दूधोंडी येथील वसंतनगर रस्त्यावरील अपघातास कारणीभूत ठरत असलेल्या अनेक दिवसापासून कृष्णा कॅनाल च्या पूलाच्या संदर्भात संरक्षणासाठी पर्यायी कथडा बांधणेत यावा किंवा संरक्षक ग्रील बसविणेबाबत लोकांची मागणी होती, या पुलावरुन दूधोंडी गावामध्ये शाळेत शिकायला जाणाऱ्या अनेक विद्यार्थांचा तसेच लोकांचा अपघात या ठिकाणांवर होत होता, या ठिकाणी अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला असल्याने याची कल्पना वसंतनगर येथील काही ग्रामस्थांनी ग्रामपंचायत याना निदर्शनास आणून कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते मा. जे के (बापू) जाधव यांच्या कानावर घातली, याची दखल घेऊन ग्रामपंचायत च्या माध्यमातून बापुनी या पुलावर संरक्षक ग्रील बसविण्यासाठी पाठपुरावा उपविभागीय अधिकारी कृष्णा कालवा पी जी महिंद व अमोल पाटील शाखाधिकारी पाठबंधारे शाखा किर्लोस्करवाडी यांच्याकडे तसेच कृष्णा कॅनाल पाटबंधारे विभागाकडे करण्यात आला होता, आज त्या पुलाचे संरक्षक ग्रिल तात्काळ मध्ये त्या विभागाकडून बसविण्यात आले, यावेळी संरक्षक ग्रील बसविण्यात आलेल्या कामाची पाहणी त्या ठिकाणी जाऊन युवा नेते सुधीर (भैय्या) जाधव यांनी केली, यावेळी वसंतनगर येथील ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले व बापूंचे आभार ही मानण्यात आले.*