सांगली जिल्ह्यात पान शॉपवर धाडी ; सुमारे 30 हजारांचा प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा जप्त : भिलवडीतही संकेत

सांगली : अन्न व औषध प्रशासनाने २२ ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्री संदर्भात जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या पान शॉपवर धाडी टाकून एफआयआर दाखल केले आहेत. या कारवाईत 15 ठिकाणी धाडी टाकून एकूण ३० हजार २९९ रूपये किंमतीचा साठा जप्त केला आहे. कोणीही प्रतिबंधित अन्न पदार्थ्यांचा साठा विक्री करु नये, असे करताना आढळल्यास त्यांचविरुध्द अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन सहायक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांनी केले आहे. भिलवडी येथे लवकरच धाडी टाकल्या जाणार असल्याचे संकेत मिळत आहे.
या कारवाई दरम्यान सांगली शहरामधील में सुदर्शन पान शॉप, अलदर चौक, मिरज सांगली रोड, सांगली व अलदर चौक एमएसईबी रोड येथील मे सिलेक्ट पान शॉप, मे राघवेंद्र पान शॉप व मे निर्मल पान शॉप. वाळवा तालुक्यामधील आष्टा बसस्थानक जवळील मे मामा भाचे पान शॉप व मे फ्रेन्डस पान शॉप. तासगाव तालुक्यामधील तासगाव येथील मे आनंद पान शॉप, दत्तमाळ, मे युवराज पान शॉप, गुरुवार पेठ, व मे. श्री गणेश पान शॉप अँड कोल्ड्रींक्स, गुरुवार पेठ. मिरज ग्रामिण मधील अंकली बस स्थानक जवळ मे अभय पान शॉप व मे. इगल पान शॉप. पलूस तालुक्यामधील कुंडल फाटा कुंडल येथील मे कावरे पान शॉप, मे. गणेश बेकरी व पान शॉप, मे ब्रम्हदेव पान शॉप, मे मोरया पान भवन, सत्यविजय बँकेजवळ, कुंडल, अशा एकूण १५ ठिकाणी धाडी टाकुन एकूण 30 हजार 299 रूपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.