महाराष्ट्र
खटाव येथील सेवानिवृत शिक्षक मनोहर पाटील यांचे निधन

भिलवडी : खटाव ता. पलुस येथिल सेवानिवृत शिक्षक मनोहर दत्तात्रय पाटील ( वय – ७५) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. ते नरसिंह पाणीपुरवठा स्कीमचे उपाध्यक्ष म्हणुन काम करत होते. तसेच त्यांनी खटाव च्या तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणुन काम केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुली, मुलगा,सुन, नातवंडे असा परिवार आहे. माती सावरणे रविवार दि. १७ रोजी सकाळी ९: ३० वा. खटाव ता. पलुस येथे आहे.