भिलवडी जिल्हा परिषद गटात माजी उपसरपंच मोहन नाना तावदर यांची अनेक पक्षाने घेतली धास्ती
सांगली लोकसभेच्या उमेदवारांची सुरू आहे जोरदार फोनाफोनी

भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी जिल्हा परिषद गटात नेहमी आपल्या चतूर आणि चलाख वृत्तीने आपल्याकडे मतदार वळणारे भिलवडी गावचे माजी उपसरपंच मोहन नाना तावदर यांची अनेक पक्षाने घेतली धास्ती घेतली आहे. सांगली लोकसभेच्या उमेदवारांची जोरदार फोनाफोनी सुरू आहे.
नेहमीच भिलवडी ग्रामपंचायत आणि भिलवडी जिल्हा परिषद गटात असणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत भिलवडी गावचे माजी उपसरपंच मोहन नाना तावदर यांचा पुढाकार असतो. आपल्या हातखंडा कुशल कामामुळे ते नेहमीच सामान्य माणसाला न्याय देत असतात. काही ठिकाणी राजकीय खेळी वापर करून कामे करून घेत असतात. राजकारणात सक्रिय सहभाग घेत विरोधकांचा समाचार घेत असतात. अनेक वर्षांपासून असणाऱ्या राजकीय खेळीचा अभ्यासू म्हणून मोहन नाना तावदर यांचे कडे पाहिले जाते. कधी कोणाला टांग मारून चितपट करतील हे अनेकांनी अनुभवलयही आहे. याचमुळे सांगली लोकसभा निवडणुकीतील अनेक उमेदवारांनी चांगलीच धास्ती घेतली आहे तर काही उमेदवारांची जोरदार फोनाफोनी सुरू आहे, अशी चर्चा लोकांमधून सुरू आहेत.
मोहन नाना तावदर हे कोणत्या उमेदवाराबरोबर ठामपणे उभे राहणार आहेत, हे ही लवकरच स्पष्ट करणार असल्याचे ही लोकांत अनेक ठिकाणी बोलले जात आहे.