
दर्पण न्यूज विटा -खानापूर तालुका प्रतिनिधी (शिराज शिकलगार)-:
शेतकरी बांधवांच्या न्याय हक्का साठी भांडवलधार्जिंन्या सरकार विरोधात बेमुदत ठिय्या आंदोलन,,,!*
*सिंह सेना शेतकरी बांधवांच्या न्याय व हक्कांसाठी मा.जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयासमोर सांगली येथे आंदोलन करत आहे,*
*लोकशाही मार्गाने संबंधित प्रशासनाकडे निवेदने, पाठपुरावा आणि विनंत्या करूनही शेतकऱ्यांच्या सदर प्रलंबित प्रश्नांवर आंदोलनाच्या पाचव्या दिवशी हि शासना कडून कोणते हि ठोस पाऊल उचलत तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे सिहंसेनेचे हे बेमुदत ठीय्या आंदोलन सुरूच आहे.
या आंदोलनात शेतकरी, सामाजिक,राजकीय कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
शेतकरी बांधवांच्या प्रमुख मागण्या
*१) ७/१२ व इतर हक्कातील “जिल्हा पुनर्वसन अधिकारी सांगली” हा शेरा तात्काळ कमी करावा*
*२)शेतकरी बांधवांचे सर्व मालकी हक्क कायमस्वरूपी अबादित पूर्ववत करावेत*
*३)पुनर्वसन व भूसंपादन विभागातील अनियमिततेची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी व्हावी*
*४) महसूल खात्यात सदर भुसापधित शेतजमिनी विषयी झालेले आजरोजी पर्यंतचे सर्व बेकायदेशीर दस्त, फेरफार व नोंदी तात्काळ रद्द कराव्यात ,,,*
*५)दोषी अधिकारी व संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत*
*6) शेतकऱ्यांच्या मूळ मालकीच्या सदर भुसापधित शेतजमिनी, आता प्रशासना कडून कोणालाही आलोट होऊ नयेत.*
*7) शेतकरीबांधवांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष हा सुरूच राहील,,*
*७) सिलिंग व भूसंपादित जमिनींचे बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्या संबंधित शासन अधिकारी, भूमाफिया गुंड व बडवे यांच्यावर सामूहिक गुन्हेगारी मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करून गृह खात्याने कारवाई करावी*
*८) सिलिंग मधील शिल्लक असणाऱ्या शेत जमिनी व लाभ क्षेत्रात येत नसलेल्या शेत जमिनीवर जो स्लॅब लावला आहे त्या जमीन मूळ शेतकरी बांधवांना त्वरित परत कराव्यात ,,!*
*जो पर्यंत वरील सर्व प्रमुख मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत सिंहसेना शेतकरी बांधवांच्या न्याय व हक्कासाठी शेवट पर्यंत लढा देईल,,याची गांभीर्यपूर्वक मा.प्रशासनाने दखल घ्यावी, असे सिंह सेना प्रमुख
शिवसाहेब शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे.
